चोरीला गेलेल्या अथवा गहाळ झालेल्या डेबिट कार्डाचा गैरवापर रोखण्यासाठी त्यावर संबंधित कार्डधारकांचे छायाचित्र अनिवार्य करण्याच्या सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व वाणिज्य बँकांना बुधवारी जारी केल्या.
डेबिट कार्डाबाबतची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, हरविलेल्या अथवा चोरीस गेलेल्या डेबिट कार्डाद्वारे रक्कम काढून घेण्याचा सर्वाधिक फटका कार्ड जारी करणाऱ्या बँकांनाच अधिक होतो.  तो टाळण्याच्या दृष्टीने कार्डधारकांचे छायाचित्र असलेले डेबिट कार्ड जारी करणे उपयुक्त ठरू शकेल.
कार्ड चोरीला अथवा गहाळ झाल्याची तक्रार येताच बँकांनीही त्या कार्डावरील व्यवहार ताबडतोब स्थगित करणारी कार्यप्रणाली राबवावी, असेही निर्देश बँकने दिले आहेत. देशभरात विविध बँकांचे ३१ कोटींहून अधिक डेबिट कार्डधारक आहेत. बँकांच्या क्रेडिटपेक्षा डेबिट कार्डाद्वारे होणारे व्यवहार अधिक आहेत.