पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला पाठिंबा देत भारतात स्मार्टफोन तसेच टॅबलेट तयार करण्याचे ध्येय चिनी मोबाइल कंपनी लेनोवोने राखले आहे. त्याचबरोबर कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील तिसरी मोठी कंपनी बनण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
लेनोवो इंडियाच्या विपणन विभागाचे संचालक भास्कर चौधरी यांनी सांगितले की, भारतात मोबाइल उत्पादननिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक असून ४ जी तंत्रज्ञानावरील स्मार्टफोनचे उत्पादन येथून करता येईल का, याची आम्ही चाचपणी करीत आहोत.
कंपनीचा दक्षिणेतील पॉण्डेचरी येथे संगणकनिर्मिती प्रकल्प आहे. दरम्यान, कंपनीचा नवा के ३ नोट फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.