अनेक वर्षांची मरगळ झटकून देशाच्या नागरी उड्डाण क्षेत्राने उभारी घ्यावी असे दिवस दृष्टीपथात आहेत. नव्या सरकारने अर्थसंकल्पातून या क्षेत्रासाठी काही प्रोत्साहन गोष्टी जरूर दिल्या आहेत. शिवाय अनेक नव्या कंपन्यांचे भारताच्या हवाई आखाडय़ात आगमन होऊ घातले आहे. या नव्या कंपन्यांसह येणाऱ्या स्पर्धेने या उद्योग क्षेत्रात उमेदीने भरारीचे चैतन्यही निर्माण होणे अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पाकडून मिळालेले प्रोत्साहन..*नव्या ठिकाणी ‘पीपीपी’ तत्त्वावर नवीन ५० छोटय़ा विमानतळांची उभारणी
*२०१३-१४ मध्ये २,१२० कोटींचा तोटा नोंदविणाऱ्या ‘एअर इंडिया’ला सरकारकडून ६,५०० कोटींचे भांडवली स्फुरण
*२०१२ मध्ये एअर इंडियाच्या पुनर्उभारणीसाठी आखलेल्या आराखडय़ाची अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्याचा नव्या सरकारकडून निर्वाळा
*विदेशी पाहुण्यांसाठी प्रमुख ९ विमानतळांवर पुढील सहा महिन्यात ई-व्हिसा आणि आगमनसमयी व्हिसाची सोय