केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात प्रमुख १२ वस्तूंचे दर १० टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याच्या तरतुदीने संबंधित क्षेत्रातील e02समभागांचे मूल्य गुरुवारी भांडवली बाजाराच्या व्यवहारात कमालीने आपटले. या वस्तूंच्या माल वाहतूक दरवाढीमुळे रेल्वे वाहतूक महाग होण्यासह संबंधित जिनसांच्या किंमतीही वाढणार असल्याने समभागांच्या मूल्यांवर दबाव निर्माण झाला. या समभागांचे मूल्य ७ टक्क्य़ांपर्यंत घसरले. जिन्नस वाहतूक दरवाढीतून रेल्वेला नव्या आर्थिक वर्षांत अतिरिक्त ४,००० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
‘प्रभु’ अजि गमला…
माल वाहतूक दरवाढीचा फटका :
*सिमेंट : अल्ट्राटेक सिमेंट (-२.१५%), हैेडलबर्ग सिमेंट (-१.४०%),     श्री सिमेंट (-०.९३%)
*पोलाद : सेल (-३.२१%), टाटा स्टील (-१.६२%), जेएसडब्ल्यू (-०.८८%)
*खते : नॅशनल फर्टिलायझर्स (-१.८५%), टाटा केमिकल्स  (-१.८२%), गुजरात स्टेट फर्टिलायझर्स (-०.३७%)
*तेल व वायू : इंद्रप्रस्थ गॅस (-३.०५%), एचपीसीएल (-२.८९%), ऑईल इंडिया (-१.१९%) रेल्वेशी संलग्न कंपन्यांचे समभागांत चढ -उतार 

घसरले..
हिंद रेक्टिफायर्स    : रु. ८९.३० (+१४.७१%)
बारट्रॉनिक्स    : रु. १३.१९ (+५.९४%)
ट्रान्सफॉर्मर्स    : रु. १९३.९० (+३.९७%)
कमर्शिअल इंजि.    : रु. २४.२५     (+०.८३%)
टिटागढ व्हॅगन्स    : रु. ५८२.१० (+०.५०%)

वधारले..

स्टोन इंडिया    : रु. ७९.७० (-६.०७%)
कालिंदी रेल    : रु. १३५.१० (-४.०५%)
कंटेनर कॉर्पो.    : रु. १,५१८.९५ (-३.४७%)
गेटवे डिस्ट्रिपार्क    : रु. ४१०.८५ (-३.४०%)
टेक्समॅको रेल    : रु. १३५.७० (-२.५१%)