प्रवासात घालवलेला काळ हा आपल्या आयुष्यातल्या चांगल्या काळापकी एक असतो. आपण व्यवसायासाठी प्रवास करतो, प्रियजनांना भेटण्यासाठी प्रवास करतो आणि संकटाच्या परिस्थितीतही प्रवास करावा लागतो. प्रत्येक प्रवासाचे स्वत:चे असे काही धोके आहेत. प्रवासात कधी आपल्या सामानाशी संबंधित, कधी आरोग्याला, कधी पशांना, तर कधी जीवालाही धोका होऊ शकतो.
सुट्टयांचा काळ हा निवांतपणे जगण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, नव्या ठिकाणी जाऊन नव्या दृष्टीकोनातून आपल्या आयुष्याकडे परत वळून पाहण्यासाठी उपयोगी पडतो. सुट्टयांमुळे आपल्याला रोजच्या व्यस्त जीवनशैलीतून विराम मिळतो आणि जगाची दुसरी बाजू अनुभवायला मिळते. परदेशात केलेला प्रवास किंवा एखाद्या नव्या जागी पहिल्यांदा केलेल्या प्रवासामुळे नेहमीचे जुने आयुष्य मागे ठेवून नव्या पद्धती, विचारसरणींचा अवलंब करता येतो.
देशांतर्गत प्रवास तुलनेने सुरक्षित असतो; मात्र आपल्या नेहमीच्या ठिकाणांपेक्षा दूर गेल्यावर धोके वाढतात. किंबहुना घरापासून दूर गेल्यानंतर विविध प्रकारच्या काळज्यांची मालिका तयार होते. विमानतळासारख्या परदेशी ठिकाणी सामान हरवण्यापासून ते पारपत्र हरवण्यापर्यंत, आजारपणाच्या खर्चापासून वैद्यकीय आणीबाणीपर्यंत प्रवासात कोणत्याही प्रकारे धोका उत्पन्न होऊ शकतो.
परदेशी चलनामध्ये अनपेक्षित खर्च करण्यामुळेही एखाद्या व्यक्तीच्या एकंदर आíथक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी तो विनात्रासाचा होण्यासाठी थोडे नियोजन करणे गरजेचे आहे. अनिश्चितता लक्षात घेता परदेशी प्रवास करताना वेळेत विमा काढणे उत्तम असते. घरापासून दूर असताना पर्यटन विमा हा संरक्षक कवचासारखा असतो. प्रवासात गुंतवलेल्या पशांचे आधीच संरक्षण करणे हे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा केव्हाही चांगले. पारपत्र किंवा सामान हरवले नाही तर प्रवासात वैद्यकीय मदत लागली तर पर्यटन विमा उपयोगी पडतो. म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वीच नियोजन केले तर तुमची सहल निश्चित विनात्रासाची होईल. पर्यटन विमा हा प्रवासाशी संबंधित सर्व चिंताची काळजी घेणारा मित्र आहे.
बहुतेक विमा कंपन्यांकडून दिला जाणारा ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ पर्यटन विमा हा परदेशातील प्रवास विनाकटकटीचा व्हावा याची खात्री करतो. निवांत मनाने नव्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्याचा मार्ग हा पर्यटन विमा उपलब्ध करून देतो. बहुतेक पर्यटन विमा योजना प्रवासाच्या कारणानुसार व्यावसायिक व खासगी प्रवास करतात आणि तेही खिशावर ताण न देणाऱ्या किंमतीत. त्यामुळे निवांत राहणे आणि कोणतीही चिंता न करता परदेशात प्रवास करणे याद्वारे सहज शक्य होते.

‘स्टँडर्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह’ पर्यटन विम्यांतर्गत उपलब्ध छत्र पुढीलप्रमाणे :
अचानक उद्भवणारे वैद्यकीय खर्च : आजारपण किंवा अपघातामुळे तातडीने उद्भवणाऱ्या वैद्यकीय परिस्थितीमुळे येणारे खर्चाला छत्र मिळते. त्यात योजनेच्या पत्रकानुसार दवाखान्यातील उपचार, दवाखान्यात दाखल झाल्यानंतरचा खर्च, वैद्यकीय खर्च, उपचार, निदान चाचण्या समाविष्ट आहेत.
वैद्यकीय परिस्थितीमुळे तातडीने मायदेशात परतणे : निवडलेल्या ‘सम अश्युअर्ड’नुसार मायदेशी तातडीने परत जाण्याचा खर्च सुरक्षित केला जातो.

परत पाठवणीचा खर्च : विमा उतरवलेल्या व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा आणि उर्वरित सामान भारतात पाठवण्याचा खर्च कव्हर केला जातो.

दातांच्या समस्येचा खर्च : नसíगक दातांसाठी एनेस्थेटिक उपचारांचा खर्च कव्हर केला जातो.

हॉस्पिटल कॅश : आजारपण किंवा अपघात झाल्यास रुग्णालयात दाखल झाल्यानंतर योजनेच्या पत्रकात लिहिल्याप्रमाणे दैनंदिन भत्ता मिळतो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे अपघाती मृत्यू आणि कायमचे पूर्ण अपंगत्व : रेल्वे, बस, विमान अशा सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना दुखापत होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास योजनेच्या वैयक्तिक अपघात विभागात उल्लेख केलेल्या ‘सम इन्शुयर्ड’ व्यतिरिक्त कंपनी योजना पत्रकात लिहिलेले ‘सम इन्शुयर्ड’ही कंपनी देते.

वैयक्तिक अपघात : अपघातामुळे मृत्यू किंवा कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास नुकसानभरपाई दिली जाते.
विमानास उशीर : मूळ वेळापत्रकापेक्षा विमान १२ तासांपेक्षा उशीरा आल्यास भरपाई दिली जाते.
सामान आणि वैयक्तिक कागदपत्रे गहाळ झाल्यास : गहाळ झालेली कागदपत्रे व सामानाची भरपाई करताना आलेला खर्च दिला जातो. ‘चेक इन’ केलेले सामान कायमचे हरवल्यास नुकसानभरपाई दिली जाते. ‘चेक इन’ केलेले सामान १२ तासांपेक्षा जास्त उशीरा आल्यास गरजेच्या वस्तू, कपडे आणि औषधे घेण्यासाठी आलेल्या खर्चाची भरपाई दिली जाते.

वैयक्तिक दायित्व : विमाधारकामुळे इतर व्यक्तीचा मृत्यू, दुखापत किंवा आरोग्यास अथवा मालमत्तेस हानी झाल्यास ‘थर्ड पार्टी’ला त्याची नुकसानभरपाई दिली जाते.
आíथक आणीबाणीच्या वेळेस सहाय्य : चोरी, दरोडा यांमुळे विमाधारक आíथक आणीबाणीच्या परिस्थितीत सापडल्यास त्याला विमा योजनेत उल्लेख केलेल्या रकमेपर्यंत विमाछत्र मिळते.
अचानक कराव्या लागणा-या प्रवासाचे फायदे : विमाधारक व्यक्ती शारीरिक दुखापत किंवा रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे मायदेशी जाणारे विमान पकडू शकली नाही तर हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च दिला जातो.
अपहरणामुळे होणा-या त्रासासाठी भत्ता : विमा योजनेच्या कालावधीत विमाधारक सागरी किंवा आकाश वाहतुकीच्या सार्वजनिक साधनांतून प्रवास करताना अपहरण झाल्यास विमा योजनेच्या मर्यादेनुसार दैनंदिन अपहरण भत्ता दिला जातो.

(लेखक एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आहेत.)