भारतातील आघाडीची विद्युत उपकरण निर्माती कंपनी सॅमसन्ग इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने ‘फ्लॅगशीप कस्टमर सव्‍‌र्हिस प्लाझा’ संकल्पनेस सुरूवात करण्यात आली असून यामुळे उत्कृष्ट दर्जाची विक्रीपश्चात सेवा खास ग्राहकांकरता देणे शक्य होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन सॅमसन्ग दक्षिण-पश्चिम आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. पार्क यांनी केले. याप्रसंगी बी. डी. पार्क म्हणाले, सॅमसन्गमध्ये काम करताना आमची ताकद प्रामुख्याने ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे यावर अवलंबून आहे. आमच्या अद्ययावत सेवा आराखडय़ामुळे प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना आनंद देणे शक्य झाले असून ग्राहकांना समाधानकारक सेवा देऊन ब्रॅण्डबरोबर अधिकाधिक लोक जोडणे शक्य होणार आहे. ते म्हणाले की, ‘फ्लॅगशीप कस्टमर सव्‍‌र्हिस प्लाझा’ ही नवीन ग्राहक सेवा दर्जा निश्चितीतील महत्त्वाचे पायरी आहे. तसेच सर्व प्रकारच्या उत्पादनांकरता एकाच छताखाली सेवा याअंतर्गत देता येईल. यामध्ये उत्पादनाबाबत माहिती देणे, ग्राहकांशी संवाद आणि हातांनी चालवणाऱ्या डिव्हाईसेसबाबत समोरासमोर सेवा यांचा समावेश आहे. कंपनीचे विद्युत उपकरण क्षेत्रातील देशातील सर्वात मोठे सेवा जाळे आहे. दिल्लीतील ओखलासारख्या मध्यवर्ती ठिकाणी कंपनीचे हे सेवा केंद्र २६ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत आहे. एकाच वेळी ३० ग्राहकांना हाताळण्याची या केंद्राची क्षमता आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सची वार्षकि विक्री १८७.८० अब्ज डॉलर आहे.