मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
२५ ते ३० लाख रुपयांमध्ये घरखरेदी सुलभ व्हावी, यादृष्टीने विकासक तसेच गृहवित्त कंपन्यांना भारताबाहेरून अधिक प्रमाणात निधी उभारणीसाठी रिझव्र्ह बँकेने परवानगी दिली आहे. विकासक तसेच वित्त कंपन्यांना यांच्यासाठी आता ही मर्यादा १०० कोटी डॉलर म्हणजेच ५,४०० कोटी रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तथा अवघ्या तीन महिन्यांसाठीच या माध्यमाचा उपयोग या क्षेत्राला करता येणार असल्यामुळे त्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
विकासक तसेच गृहवित्त कंपन्यांना माफक दरातील अनुक्रमे गृहबांधणी तसेच कर्जपुरवठा यासाठीच ही मर्यादा मध्यवर्ती बँकेच्या नव्या अध्यादेशानुसार वाढविण्यात आली आहे. या निधीचा उपयोग संबंधिताना २५ ते ३० लाख रुपयांच्या घरासाठी करावा लागणार आहे. मात्र ही सुविधा मार्च २०१३ पर्यंत अशा अल्पकालावधीसाठीच असल्यामुळे या निर्णयाचे बांधकामाशी निगडित उद्योगांकडून स्वागत झालेले नाही.
'जॉन्स लॅन्ग लासेले' या बांधकाम गुंतवणूक संस्थेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक (भांडवली बाजार) शोभित अगरवाल यांनी स्पष्ट केले की, विदेशातून निधी उभारण्यासाठी मुभा दिली गेलेली १०० कोटी डॉलरची मर्यादा ही अपुरी आहे. मात्र सरकारने टाकलेले पाऊल नक्कीच सकारात्मक आहे. या क्षेत्राची गरज पाहता ते आणखी पुढे पडण्याची आशा आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















