गृहवित्त क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी कंपनी ‘डीएचएफएल’ने सर्व महिला कर्मचारी असलेली पहिली शाखा ठाणे जिल्ह्यातील विरार (पूर्व) येथे सुरू केली आहे. शिपायापासून शाखा व्यवस्थापक पदापर्यंत येथे महिला कर्मचारी आहेत. रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पुष्पा प्लाझाच्या पहिल्या मजल्यावर ही शाखा आहे. महिला सक्षमीकरणाच्या गौरवार्थ पडलेले कंपनीचे हे पाऊल आहे, असे या शाखेच्या प्रारंभाच्या निमित्ताने कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांनी म्हटले आहे. विदेशात दुबई आणि लंडन येथे कार्यालये असलेल्या या कंपनीचे देशभरातील ४६३ ठिकाणी जाळे आहे. कंपनीची विरार येथील ही शाखा मुंबई महानगर भागातील २१ शाखा आहे. तर वसई-विरार पट्टय़ातील पाचवी शाखा आहे.