आयटी कंपन्यांची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या नासकॉमच्या २५ व्या अधिवेशनामध्ये सर्वच सत्रांमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती आयटी कंपन्यांनाच बसलेल्या डिजिटल धक्क्याची. गेल्या दोन दिवसांतील सर्वच चर्चामध्ये सहभागी देश- विदेशातील तज्ज्ञांनी त्यावर सांगितलेली उतारा आहे तो हा डिजिटल धक्का पचविण्याचा. तो पचविण्यासाठी आयटी कंपन्यांना त्यांच्या रचनांमध्ये आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागणार आहे, तो करता आला तरच भविष्यात यश मिळेल, अन्यथा अस्तंगत होण्याच्या दिशेने प्रवास सुरू होईल, असा इशारा केबीजी ग्रुपचे रूडी पीटर्स, गुगलचे राजन आनंदन, वॉलमार्टचे जेरीमी किंग, मर्सडिीझचे डॉ. मायकेल गोíरझ आदी तज्ज्ञांनी दिला.
नासकॉमच्या यंदाच्या अधिवेशनातील चर्चाच्या केंद्रस्थानी डिजिटल धक्का हाच महत्त्वाचा विषय आहे. आजपर्यंत चर्चा होती ती माहिती तंत्रज्ञानाची. आता या विषयाने डिजिटल हे पुढचे पाऊल टाकले असून त्यामुळे कंपन्यांच्या रचना व कार्यपद्धतीमध्येच आमूलाग्र बदल करण्याचे आव्हान आयटी कंपन्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे साहजिकच त्या अनुषंगाने अनेक परिसंवादांची रचना करण्यात आली असून या विषयातील देश- विदेशातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
डिजिटल डार्वििनझमच्या परिसंवादानंतर बोलताना केबीजी ग्रुपचे रूडी पीटर्स म्हणाले की, आयटी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीपासूनच आता या नव्या डिजिटल आव्हानांचा विचार करावा लागणार आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचारी त्याच पारंपरिक पद्धतीने काम करत राहिले तर तेही कालबाह्य ठरतील. म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनांमध्ये मूलभूत डिजिटल परिवर्तन येईल, अशा कार्यशाळा आयोजित कराव्या लागतील. पूर्वी विक्री व्यवस्थापनासाठी प्रत्यक्ष दुकानात जावे लागे, त्याची गरजच आता राहिलेली नाही. त्यामुळे विक्री व्यवस्थापक पदावर असलेल्या व्यक्तीच्या कामाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार आहे, त्याचे पदनामही बदलेल. त्यासाठी मानसिकता बदलावी लागेल ते मोठेच आव्हान असणार आहे. मात्र भविष्यात यश हवे असेल तर मानसिकता बदलण्याला पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
यंदाच्या नासकॉममधील सर्वच परिसंवादांमध्ये या डिजिटल धक्क्याची चर्चा होते आहे. विषय थेट नसला तरी अनेक परिसंवादांच्या अखेरीस होणाऱ्या प्रश्नोत्तरांमध्येच या विषयावर वक्त्यांना प्रश्न विचारले जातात आणि अखेरीस विषय डिजिटल धक्क्यापर्यंत पोहोचतो, असा अनुभव सहभागी आयटी कंपन्यांच्या सीइओ, सीआयओ आणि सीटीओजना येत आहे.

डॉ. मायकेल गोíरझ, मुख्य माहिती अधिकारी, मर्सििडझ
पूर्वी केवळ गाडय़ा विकण्यापुरतेच मर्सििडझचे काम मर्यादित होते. पण बदलत्या डिजिटल कालखंडात तग धरून यशही मिळवायचे तर ग्राहकांच्या मागणीनुसार बदलणे भाग आहे हे कंपनीला लक्षात आल्यानंतर आता गाडय़ांच्या उत्पादनाबरोबरच प्रवासाशी संबंधित लागणाऱ्या ग्राहकोपयोगी डिजिटल गोष्टींचा पसाराही कंपनीने वाढविला आहे. आणि त्या मूल्यवíधत गोष्टींमुळेच प्रत्यक्ष उत्पादन असलेल्या मर्सििडझच्या गाडय़ांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे, असे लक्षात आले. त्यामुळे पूर्वीच्या व्यवसायाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे.

माइक मॅकनाम्रा , मुख्य माहिती अधिकारी, टेस्को
रिटेल विक्रीमध्येही आता आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. त्याशिवाय रिटेलमधील कंपन्यांना तग धरता येणार नाही. कारण मोबाईलच्या माध्यमाचा वापर करत प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या ग्राहकांच्या पद्धतीमुळे सर्व जुनी समीकरणे मोडीत निघाली आहेत. त्याची जागा आता डिजिटल समीकरणांनी घेतली आहेत. ती समीकरणे शिकून त्यापुढे जाणारा प्रवास करावा लागेल, तरच कंपन्यांना भविष्यात यश प्राप्त होईल.

-विनायक परब