मला बजेटबाबत जास्त काही ज्ञान नाही. पण मोदी सरकारमुळे आपल्या देशात नक्कीच बदल येतोय असं मला वाटतं. मोदीजी ‘अच्छे दिन’बद्ल बोलले होते, त्याची हळूहळू  सुरुवात होत आहे. देशात अजून चांगले बदल होण्यासाठी आपण सरकारला थोडा वेळ देण्याची गरज आहे. मोदींचे परदेश दौरे असो वा इतर देशांच्या पंतप्रधानांची त्यांनी घेतलेली भेट असो, या गोष्टी नक्कीच भविष्यात कामी येतील. मी या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. या सर्व गोष्टी पाहता मी एकच म्हणेण की, सरकारचे अजून दहा वर्षांचे प्लॅनिंग चालू आहे आणि त्याकरिताच आता सर्व हालचाली सुरु आहेत.
आपल्याला हवे असलेले बदल लगेच एका वर्षात होण शक्य नाही. त्यासाठी आपणही सरकारकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. तरच बदल होईल. जर सिनेसृष्टीबाबत म्हणाल, तर मी सरकारकडून अजिबात अपेक्षा करत नाही. त्यासाठी मी माझ्या प्रेक्षकांकडून अपेक्षा करतो. जर या क्षेत्रातील व्यक्तींनी चित्रपटसृष्टीला अजून पुढे नेले तर सरकारही नक्कीच याकडे अधिक लक्ष देईल.