स्पर्धा आयोगाने बजावलेल्या ६३० कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम ताबडतोबीने भरण्याचा सर्वोच्च न्यायालयाने डीएलएफला दिलेल्या आदेशाचे पडसाद बुधवारी शेअर बाजारात या कंपनीच्या समभागाच्या भावावरही उमटले. मंगळवारच्या तुलनेत तब्बल साडेचार टक्क्यांच्या घसरणीने डीएलएफचा समभाग बीएसईवर १८३.०५ रुपयांवर स्थिरावला. या पडझडीपायी कंपनीच्या बाजारमूल्यात तब्बल १,५१०.७१ कोटी रुपयांनी ऱ्हास होऊन ते ३२,६१५.२९ कोटींवर घसरले आहे.