‘डोअरिमट’ या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या घरगुती सेवा पुरवठादार कंपनीने ३० लाख डॉलरचा निधी उभारला आहे. ‘हेलिऑन व्हेंचर्स एन्ड कलारी कॅपिटल’च्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या निधीमुळे कंपनीला मुंबई तसेच इतर प्रमुख शहरात सध्याच्या सेवांचे जाळे तयार करण्यास व ते प्रस्थापित करण्यास स्त्रोत उपलब्ध होतील.  कंपनी या क्षेत्रातील विपणन, चलन आणि तंत्रज्ञान विभागासाठी चांगला अनुभव असलेल्या व्यावसायिकांच्या शोधात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव अगरवाल म्हणाले ेकी, सोयीस्करपणा आणि दर्जेदार सेवा यावर भर देणाऱ्या डोअरिमटने कामात व्यग्र असलेल्या शहरातील घरगुती कामांचा त्रास हा मोबाइल अॅप आणि संकेतस्थर्ळाद्वारे कमी करण्याचे ध्येय ठेवले आहे. उपलब्ध निधीच्या मदतीने डोअरिमट कंपनी आक्रमक, ध्येयवादी विस्तारयोजना हाती घेणार असून त्यातून ग्राहक व सेवा पुरवठादारांसाठी चांगले कामकाज आणि नेटवìकग क्षमता यांसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेली कंपनी म्हणून स्थापन करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.