येणारे प्रत्येक नवीन वर्ष हे उद्याच्या चांगल्या भवितव्याचे अभिवचन घेऊन येत असते. आर्थिक स्वातंत्र्याची प्राप्ती नेहमीच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या लक्ष्यसूचित वरच्या स्थानावर असते; त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक वर्षांत जीवनांत गुणात्मक बदल घडविणाऱ्या आर्थिक कुशलतेची नि:संशय लक्षणीय भूमिका राहते.  परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की, आपल्या आयुष्याला दर्जेदार वळण देऊ  शकेल अशा आर्थिक नियोजनातील काही मूलभूत तत्त्व-नियमांकडे आपले नेहमीच दुर्लक्ष होत असते. २०१७ सालात मात्र आपण या साध्या पण प्रभावी आर्थिक संकल्पांना सुरुवात करून ‘आर्थिक निर्वाणा’च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकायलाच हवे!

बचतीच्या सवयी शिकून घेऊ

जे लोक शाश्वत संपत्ती निर्माण करतात आणि तसे करण्यात जे अपयशी ठरतात या दरम्यान बचतीच्या दिशेने असलेला वृत्तीमधील फरक इतकेच मूलभूत अंतर असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, श्रीमंत पहिल्यांदा जतन करतात मग खर्च करतात. त्या उलट गरीब आधी खर्च करतो आणि बाकी उरेल त्याची बचत करतो. काहीही झाले तरी बचतीच्या सवयींचा बळी देऊन महागडे खर्च होता कामा नयेत. शेजाऱ्यापेक्षा वरचढ राहण्याच्या खोटय़ा प्रतिष्ठेतून अनावश्यक असलेल्या वस्तूंच्या अनियंत्रित खरेदीतून आपणच आपल्या भविष्याची लूट आणि चांगल्या व सुरक्षित जीवनाच्या शक्यतेला संपुष्टात आणत असतो.

श्व्  तुमची बचत किती असायला हवी? या संबंधाने एक मूलभूत नियम आहे – तो म्हणजे तुमचे वय जितके तितके अर्थातच टक्केवारीच्या स्वरूपात! म्हणजे जर तुम्ही ३० वर्षांचे असाल, तर दरमहा तुमच्या करपश्चात उत्पन्नाच्या किमान ३० टक्के बचतीचे तुमचे उद्दिष्ट असायला हवे; जसे तुम्ही ४०चे व्हाल तेव्हा लक्ष्य ४० टक्क्यांचे असावे, आणि याच स्वरूपात पुढे बचत वाढत जायला हवी.

परंपरेच्या पल्याड विचार हवा

एक बचतकर्ता समाज म्हणून आपला कायम निश्चित लाभाच्या अथवा मुद्दलाची सुरक्षितता असणाऱ्या पारंपरिक बचत साधनांच्या दिशेनेच मोठा कल असतो. दीर्घावधीत हे आपल्या आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर रूपात हानिकारक ठरल्याचे सिद्ध झाले आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीपश्चात जीवनासारख्या लांब पल्ल्याचे लक्ष्य ठेवून गुंतवणूक करीत असाल, तेव्हा जोखीम सुरक्षेवर अत्याधिक भर राहिल्याने चक्रवाढ व्याजाचे लाभ आणि महागाई दराला मात देणाऱ्या परताव्यापासून तुम्हाला वंचित ठेवले जाईल. अशा तऱ्हेचा परतावा तुम्हाला म्युच्युअल फंडांसारख्या बाजाराशी संलग्न पर्यायातून मिळू शकेल. म्हणूनच ‘मुद्दलाच्या सुरक्षे’च्या मानसिकतेतून बाहेर पडून ‘संपत्ती निर्माणा’च्या मानसिकतेला मुक्तपणे स्वीकारणाऱ्या मानसिक संक्रमणाची नितांत आवश्यकता आहे. तुमचा गुंतवणूकविषयक कल हा केवळ जोखीम सहन करण्याची तुमची क्षमता या एकमेव निकषावर बेतलेला असू नये.

श्व्समजा एक व्यक्ती निवृत्तीपश्चात जीवनाची तजवीज म्हणून ३० वर्षांसाठी पीपीएफ खात्यात दरमहा १०,००० रुपयांची बचत करीत असेल, तर त्याच्या निवृत्तीपर्यंत २ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पण जर त्या व्यक्तीने इक्विटी म्युच्युअल फंडात दरमहा एसआयपीच्या रूपात तितकेच १० हजार रुपये जमा केले तर निवृत्तीच्या समयी त्यांना मिळणारा लाभ तुलनेने नक्कीच जास्त असेल. कारण समभागांच्या परताव्याची ऐतिहासिक कामगिरी पाहिल्यास वार्षिक सरासरी १२ टक्के दराने लाभ त्यातून दीर्घावधीत निश्चितच मिळालेला दिसून येतो.

लक्ष्यनिश्चिती आणि त्या दिशेने एसआयपी!

आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा तपशीलवार मसुदा तयार करून २०१७ सालाची सुरुवात करू या. प्रत्येक उद्दिष्टासाठी हाती असलेला कालावधी, महागाई दराच्या तुलनेत त्या त्या समयी अपेक्षित रक्कम आणि ती प्राप्त करण्यासाठी दरमहा करावी लागणारी बचत हा तपशील स्पष्ट रूपात आपल्यापुढे हवा. लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांच्या आपल्या या जंत्रीत मुलांचे शिक्षण आणि निवृत्तीपश्चात जीवनासाठी नियोजनाला सर्वात वरचे स्थान असणे महत्त्वाचेच आहे. उद्दिष्टांची निश्चिती करणे हे कोणत्याही तऱ्हेने ‘निर्थक’ अथवा बिनमहत्त्वाची गोष्ट नाही. किंबहुना त्यातून दीर्घावधीच्या तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा तो एक उपचारात्मक व्यायाम प्रकार आहे. यातून तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शिल्लक अवधी आणि त्याला समर्पक गुंतवणूक पर्याय यांची सांगड स्वयंचलित स्वरूपात घातली जातेच, इतकेच नव्हे तर दीर्घावधीत आपल्या मानसिकतेला आपोआपच संयम-सबुरीचे वळण दिले जाते, जेणेकरून बाजारातील उतार-चढ आपल्याला विचलित करीत नाहीत. आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी म्युच्युअल फंडात एसआयपी (सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान)द्वारे गुंतवणूक ही आजवरचा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे.

श्व् जर निवृत्तीपश्चात नियोजन या सारख्या मोठय़ा कालावधीच्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करायची झाल्यास, त्यासाठी अधिक आक्रमक आणि उच्च परताव्याची शक्यता असणाऱ्या मिड कॅप फंडांची निवड करता येईल. अर्थातच तुम्ही गुंतवणुकीला किती लवकर सुरुवात केली आहे, यावरही ते अवलंबून आहे. तुमच्या उद्दिष्टांनुरूप एसआयपीचा असा आराखडा बनवून, त्या दिशेने निरंतर सुरू असलेल्या प्रगतीला जोखत जाणे हे तुमच्या अधिकाधिक गुंतवणूक करण्याच्या हुरूपाला निश्चितच बळ देणारे ठरेल. उद्दिष्ट गाठण्यासाठी शिल्लक कालावधी पाहून गुंतवणुकीला अपेक्षित वळण त्यातून देता येईल.

गुंतवणुकीला गती प्रदान करा

जेव्हा गुंतवणुकीची गोष्ट येते, तेव्हा लक्षात असू द्या की, ‘चांगली सुरुवात म्हणजे निम्मे काम फत्ते’ अशीच असते. योग्य त्या पर्यायाची सुयोग्य निवड हे साधे कार्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जसे तुमच्या मिळकतीत दरसाल वाढ होत राहील, तसे कटाक्षाने तुमच्या गुंतवणुकीची गतीही वाढली पाहिजे. ‘जीवनशैलीच्या फाजिल आकांक्षा’पासून मात्र सावध राहा. तात्पुरत्या समाधानाची ऐष म्हणून एक कर्ज चुकते करण्यासाठी दुसरे कर्ज अशा शेवट नसलेल्या नष्टचर्यावर तुम्ही मार्गस्थ होणार नाही, ही दक्षता घ्यावीच लागेल.

श्व्  जर तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची रक्कम निवृत्तीपश्चात नियोजन म्हणून म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतविणे सुरू केले असेल, तर ही गुंतवणूक पुढील २५ वर्षांत दरसाल १० टक्के अथवा तत्सम समर्पक प्रमाणात वाढत राहिली पाहिजे. या वाढीव गुंतवणुकीतून जो एक समग्र संपत्ती कोष तयार होईल तो निश्चितच आश्चर्यकारक असेल. आधीपासून एसआयपी गुंतवणूक सुरू असेल तर २०१७ नंतरच्या प्रत्येक वर्षांत त्यात १० टक्के दराने वाढ करण्याचा प्रयत्न हवा.

कर-बचतीची तज्ज्ञता मिळवा

आपल्यापैकी बहुतांश हे कर-बचतीच्या अनेक उपलब्ध उपायांचा पुरेपूर वापर करीत नाहीत आणि दरसाल आपले हजारो रुपये अशा तऱ्हेने वाया घालविले जातात. काही वर्षांच्या कालावधीत ही वाया जाणारी रक्कम खूप मोठीही असू शकते. याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाचले जाणारे पैसे (भले ते पाच-दहा हजार रुपयेच असतील!) आपण निश्चित केलेल्या जीवनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दृष्टीने उपयुक्त गुंतवणकीचा घटक बनू शकले असते. करविषयक नियमांमध्ये होत असलेल्या फेरबदलांना, विशेषत: आपल्या कर-बचतीला प्रभावित करणाऱ्या बदलांच्या बरोबरीने वाटचाल २०१७ सालापासून सुरू करू या. अन्य कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. करांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपली समज वाढवत जुजबी ज्ञानातून वाढवत नेणेच उपयुक्त ठरेल.

श्व्  प्राप्तिकर कलम ८०सी अंतर्गत कर-बचत आणि दीर्घावधीत संपत्तीनिर्मितीसाठी ईएलएसएस फंड (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम) हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. फंड मॅनेजरच्या विशेषज्ज्ञतेला समभागांमध्ये मोठय़ा कालावधीत भांडवलवृद्धीच्या शक्यतांची जोड देणारी, कर वजावटीच्या कलम ८०सी नुसार झालेली ही युती अद्वितीय आहे.

डी. पी. सिंग

(लेखक एसबीआय म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक व मुख्य विपणन अधिकारी आहेत)