आघाडीची सराफ पेढी लागू बंधू यांनी येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत दुर्मिळ हिऱ्यांचे प्रदर्शन योजले आहे. शिवाय या हिऱ्यांविषयी माहिती देणारी कार्यशाळा आपल्या दादर, बोरिवली तसेच ठाणे व पुणे येथील शोरूम्समध्ये आयोजित केली आहे. ही कार्यशाळा १६ व १७ फेब्रुवारीला, २३ आणि २४ फेब्रुवारी होत असून त्यात ५ कॅरेट्सपर्यंतचे हिरे (सॉल्टिेअर) पाहावयास मिळतील.  
लागू बंधूमध्ये आयोजित या कार्यशाळांचे संचालन जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ अमेरिका (जीआयए)द्वारे केले जाणार असून, त्या विनाशुल्क असण्याबरोबरच, उपस्थितांना उलट सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हिऱ्यांचे विविध प्रकार, हिऱ्यांची पारख, ते कसे निवडावेत आणि हिऱ्यांमधील गुंतवणूक कशी फायदेशीर ठरू शकते याबद्दल उपस्थितांना माहिती दिली जाईल. सहभागासाठी कोणत्याही खरेदीचीही आवश्यकता नाही, असे लागू बंधू ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक दिलीप लागू यांनी स्पष्ट केले. या प्रदर्शन व कार्यशाळेच्या निमित्ताने लागू बंधूने हिऱ्यांवर १० टक्क्यांपर्यंत सूट, नवग्रहांच्या खरेदीवर १५ टक्क्यांपर्यंत सूट, दागिन्यांची मोफत तपासणी व सल्ला असे विविध फायदेही ग्राहकांना देऊ केले आहेत. चारही शोरूम्समधील कार्यशाळांना उपस्थित असलेल्यांपैकी निवडक २५ जणांना वांद्रे येथील ‘जीआयए’च्या संकुलात निमंत्रित करून तेथील डायमंड ग्रेडिंग लॅबॉरेटरी दाखविली जाईल. यावेळी जीआयएकडे ग्रेडिंगसाठी आलेला मोठय़ात मोठा हिरा पाहण्याची संधी त्यांना दिली जाईल. शिवाय खाणीपासून शोरूमपर्यंत हिऱ्याचा प्रवास कसा कसा होतो याची चित्रफीतही दाखविली जाईल.