आघाडीच्या खासगी विदेशी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने ‘सिईंग इज बिलिव्हिंग’ या जागतिक प्रकल्पाचा भाग म्हणून टाळता येणारे अंधत्व आणि नेत्रदोष हाताळण्यासाठी महाराष्ट्रात पाच नेत्रदृष्टी केंद्रांचे नुकतेच उद्घाटन केले. या नव्या उपक्रमामुळे आता भारतभरात बँकेची १२० केंद्र झाली आहेत. ही नवी केंद्र लातूर, नांदेड, परभणी आणि जालना आदी जिल्ह्यत (महाराष्ट्र) स्थापन करण्यात आली आहेत.

loksatta analysis increasing sugar production in maharashtra
विश्लेषण : साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी?
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

हा प्रकल्प ऑपरेशन आयसाइट युनिव्हर्सल या कॅनेडाच्या एनजीओबरोबर आणि उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटल (उदगीर—महाराष्ट्र) आणि श्री गणपती नेत्रालय (जालना — महाराष्ट्र) या भागीदार हॉस्पिटलबरोबर संलग्नितपणे राबवण्यात येत आहे.  बँकेने २००३ सालापासून भारतातील सीईंग इज बिलिव्हिंग या प्रकल्पासाठी १० दशलक्ष यूएस डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसे उमटवण्यासाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे.

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतातील प्रमुख कार्यकारी अधिकारी झरीन दारूवाला यांनी सांगितले की, देशात डोळ्यांच्या काळजीसाठी योग्य यंत्रणा उभारून, आम्ही आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधा सुधारत आहोत.

शाश्व्त गुंतवणूक आणि नावीन्यपूर्णता यांच्या साहाय्याने आणि सिईंग इज बिलिव्हिंग प्रकल्पाच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणांबरोबरच्या एकीकरणाने, आम्ही भारतातील असंख्य मर्यादित समुदायासाठी या उपRमाद्वारे विस्तारीत परिणाम घडवून आणत आहोत, असेही त्या म्हणाल्या.