ग्रीसमधील आर्थिक पेचाचे पडसाद सोमवारी मुंबई शेअर बाजारावर उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३५ अंशानी आपटला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवरही याचा परिणाम झाला. निफ्टी १६६ अंशानी पडला. बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही आपटले. ग्रीसमधील आर्थिक पेचाच्या धोक्यामुळे आशियातील इतर बाजारांवरही सोमवारी नकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १.९२ टक्क्यांनी पडला. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर याचा परिणाम झाला आणि त्यांचे भाव पडले.
लवकरच घसरणीची मोठी लाट