मनोरंजन व उद्योग यांची सांगड घालणारा व कोटय़वधीच्या बॉलिवूडवर चर्चा झडणारा ‘फिक्की -फ्रेम्स’ सोहळा यंदा मुंबईत येत्या बुधवारपासून रंगणार आहे.
२५ मार्चपासून सुरू होत असलेल्या तीन दिवसीय जागतिक परिषदेमध्ये माध्यम व मनोरंजनाच्या सर्व पलूंवर प्रकाश टाकला जाणार असून सहभागींसाठी ’फ्रेम युअर आयडिया’ नावाची संकल्पना जाहीर केली जाणार आहे. या व्यासपीठावर सहभागींना आपली संकल्पना/कल्पना अशाच एका संकल्पना/कथा/पटकथेच्या शोधात असलेल्या कंपनीच्या शिष्टमंडळापुढे मांडता येईल.
’फ्रेम युअर आयडिया’मध्ये गेम हॅक स्पेशलचा समावेश असेल. या उपक्रमामध्ये उच्च गुणवत्तापूर्ण आणि वेगाने विकसित होत असलेले ‘इंडी मोबाइल गेम डेव्हलपर’ यांना आपल्या संकल्पना संभाव्य गुंतवणूकदार, प्रकाशक, स्टोअर र्मचडायझर यांच्यापुढे मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. ‘गेम हॅक’ने आपल्या पहिल्याच वर्षांत भारतातील सहा शहरांमध्ये प्रवास केला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
‘फिक्की’च्या  ‘एनिमेशन, गेिमग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स’ विभागाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी याबाबत सांगितले की, ’फ्रेम युअर आयडिया’ ही संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली असून इथे उदयोन्मुख कला व्यावसायिकांना आपल्या संकल्पना मनोरंजन ुद्योगापुढे मांडण्याची संधी मिळणार आहे. ’फ्रेम युअर आयडिया’मध्ये सर्व प्रकारच्या सादरीकरणाला वाव दिला जाणार आहे. ’फ्रेम युअर आयडिया’मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला ‘फिक्की फ्रेम्स’च्या कार्यक्रमस्थळी त्यांच्यापुढे मांडण्यात आलेल्या संकल्पनेवर विचार करता येईल.