सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या येथे अलीकडेच झालेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेने बँकेच्या भागभांडवलाच्या भारत सरकारच्या ३९४ कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाढीस मंजुरी दिली. बँकेच्या १० रु. दर्शनी मूल्याचे १०.५१ लाख समभाग प्रत्येकी २७.४७ रुपये अधिमूल्यासह सरकारला प्रदान करण्यात आले.
या वाढीव गुंतवणुकीमुळे सरकारचा बँकेच्या भागभांडवलातील हिस्सा ७९.९० टक्क्यांवरून ८१.६१ टक्क्यांवर जाईल. या विशेष सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर (डावीकडून) महाबँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. मुनोत व अन्य व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते.