सरलेल्या आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत आधीच्या तुलनेत ८ टक्क्य़ांची भर पडून ती २४.३ अब्ज डॉलरवर गेली असल्याचे, औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाची (डीआयपीपी) ताजी आकडेवारी स्पष्ट करते. २०१२-१३ मध्ये एकूण थेट विदेशी गुंतवणूक २२.४ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती.

मार्च २०१४ म्हणजे आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात विदेशातून गुंतवणूक सरासरीपेक्षा दुपटीने वाढून ३.५३ अब्ज डॉलरवर गेली. मार्च २०१३ मध्ये या गुंतवणुकीचे प्रमाण १.५२ अब्ज डॉलर होते.