जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची उपकंपनी जीएमआर एअरपोर्ट्स लि.ने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विकसन, परिचालन आणि व्यवस्थापनासाठी स्थापित विशेष उद्देश साधन ‘डायल’मध्ये १० टक्के भांडवली हिस्सा मिळविला आहे. डायलचे १० रु. दर्शनी मूल्याच्या २४.५० कोटी समभाग ७.९ कोटी डॉलर (साधारण ४९४ कोटी रुपये) मोबदल्यात संपादित करण्यात आले आहेत. मलेशिया एअरपोर्ट्स (मॉरिशस) प्रा. लि. या कंपनीचा ‘डायल’मधील संपूर्ण १० टक्के हिश्श्याची खरेदी करणारा जीएमआर एअरपोर्ट्सकडून मंगळवारी करण्यात आला. यातून डायलमधील कंपनीचा भांडवली हिस्सा सध्याच्या ५४ टक्क्य़ांवरून ६४ टक्क्य़ांवर जाणार आहे. जीएमआर इन्फ्रानेच नवी दिल्लीतील या विमानतळाचे अत्याधुनिक टी-३ टर्मिनल सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारले आहे.