गोदरेज प्रॉपर्टीज लि. (जीपीएल) या गोदरेज ग्रुपच्या रिअल इस्टेट विकास विभागाने द ट्रीज हा प्रमुख प्रकल्प घोषित केला. ३४ एकर क्षेत्र असलेला हा मुंबईतील सर्वात मोठा रिअल इस्टेट प्रकल्प आहे आणि विक्रोळीमध्ये असलेल्या विकासाच्या मोठय़ा संधीतील हे पहिले पाऊल आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले विक्रोळी हे मुंबईतील सर्व व्यवसाय केंद्रांशी जोडले आहे. द ट्रीज ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून ०.१ किलोमीटर अंतरावर आहे आणि सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडमार्फत (एससीएलआर) बीकेसीला १५ मिनिटांत व फोर्टला ३० मिनिटांत जाता येते. न्हावा शेवा ते शिवडी असा पूल व प्रस्तावित नवे विमानतळ अशा शहरातील भविष्यातील नियोजित पायाभूत सुविधांमुळे विक्रोळी व पूर्व भागाचे रूपांतर मुंबईसाठी केंद्रीय ठिकाण यामध्ये केले जाईल.
गोदरेज ग्रुपच्या विक्रोळीतील जमिनीमध्ये खासगी पद्धतीने नियंत्रित खारफुटी साठे असून ते लंडनमधील लोकप्रिय हाइड पार्कपेक्षा पाचपट मोठे आहेत व यामुळे रहिवाशांना निसर्गाशी व ताज्या हवेशी जोडलेले राहूनही शहरात राहण्याचा अनुभव मिळणार आहे.
द ट्रीजच्या संमिश्र विकासामध्ये ९.४ एकरात वसलेला व्यावसायिक प्रकल्प समाविष्ट असून, त्यामध्ये गोदरेज वन या गोदरेज ग्रुपच्या जागतिक मुख्यालयाचा समावेश आहे व हे आता पूर्ण झाले आहे, तसेच ते हा समूह संपर्ण ट्रीज विकासामध्ये आणू इच्छित असलेल्या डिझाइन व गुणवत्तेचे आणि विक्रोलीसोबत असलेल्या गोदरेजच्या दीर्घकालीन नात्याचे प्रतीक आहे. ९.२ एकरात वसलेल्या या भागात पंचतारांकित हॉटेल हाय स्ट्रीट रिटेल पार्क यांचा समावेश असेल.

द ट्रीज ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून ०.१ किलोमीटर अंतरावर आहे. या गृह प्रकल्पात सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडमार्फत (एससीएलआर) बीकेसीला १५ मिनिटांत व फोर्टला ३० मिनिटांत जाता येते.