मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड प्रकारचा सोने प्रति १० ग्रॅममागे मंगळवारी २९,०१४ रुपयांवर आले. सोमवारच्या तुलनेतील त्यातील घट ही १७१ रुपयांची राहिली. गेल्या आठवडय़ापासून सोन्याचे दर कमालीने खाली येत आहेत. भांडवली बाजारातील तेजी याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. सोने खरेदीचा एक मुहूर्त, गुढीपाडवा नजीक येत असतानाही पिवळ्या धातूतील नरमाई आश्चर्यजनक मानली जात आहे. दरम्यान, शहरात चांदीचा किलोचा भाव मात्र प्रति किलोमागे २४५ रुपयांनी वधारून ४४,३४५ रुपयांवर गेला आहे.