देशाच्या निर्यात क्षेत्रातील जोरावर भारताचा विकास दर १० टक्क्य़ांपर्यंत पोहोचण्याबाबत मुख्य आर्थिक सल्लागारांनी आशावाद व्यक्त केला आहे. ८ ते १० टक्के विकास दर गाठणे भारताला सहज शक्य आहे, असे अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे. देशाच्या निर्यात क्षेत्राची गेल्या काही कालावधीतील कामगिरी उंचावणारी ठरली असून निर्यातप्रधान वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. जगभरातील अनेक देश भारतासारख्या मोठय़ा देशांबरोबर अधिकाधिक व्यापार करार करण्यास उत्सुक असल्याचेही ते म्हणाले.