दूरसंचार मनोऱ्यांच्या क्षेत्रात कार्यरत जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या धनको बँकांसोबत धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर) प्रक्रिया मार्गी लावली असून, त्यायोगे कंपनीचे चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबरोबर विलीनीकरण केले जाणार आहे. परिणामी आगामी ३-४ वर्षांत कंपनीला संपूर्ण कर्जमुक्त बनता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

युनियन बँकेच्या नेतृत्वात २२ धनको संस्थांनी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे ४,५०० कोटी रुपयांचे कर्ज हे भांडवली समभागांमध्ये परिवर्तित केले आहे. आर्थिक वर्ष २०११ अखेर कंपनीचे कमाल कर्जदायित्व १९,५७४ कोटी रुपयांच्या घरात जाणारे होते. दरम्यान, नव्याने कर्ज उचल न करता, कंपनी कर्ज पुनर्रचनेच्या (सीडीआर) माध्यमातून जीटीएलने ७,००० कोटी रुपयांची परतफेड केली. आर्थिक वर्ष २०१९ अखेपर्यंत कर्ज रक्कम ३,८०० कोटी रुपयांवर येईल आणि त्यानंतरच्या दोन वर्षांत संपूर्ण कर्ज फेडले जाईल, असे हे नियोजन आहे. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील हा सर्वात मोठा कायापालट असेल, अशी प्रतिक्रिया जीटीएल इन्फ्राचे जागतिक समूह अध्यक्ष मनोज तिरोडकर यांनी व्यक्त केली.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
vasai virar municipal corporation marathi news, vasai virar property tax marathi news
वसई: पालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट अपूर्ण, यंदाच्या वर्षी ३३८ कोटींची मालमत्ता कर वसुली
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

चेन्नई नेटवर्क इन्फ्रा ही जीटीएल समूहातील विशेष हेतू कंपनी असून, एअरसेल या दूरसंचार सेवा कंपनीसाठी १७,५०० दूरसंचार मनोरे उभारण्यासाठी स्थापित या कंपनीची २०१० साली ८,४०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात तिने खरेदी केली होती. धनको बँका व वित्तसंस्थांबरोबरच्या धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर) प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून जीटीएल इन्फ्रा आणि चेन्नई नेटवर्क इन्फ्रा यांचे १:१ समभागांच्या प्रमाणात विलीनीकरणाचे पाऊल टाकले गेले असून, नियामकांकडूनही त्याला मंजुरी मिळाली आहे. शिवाय दोन्ही कंपन्यांचे कर्ज हे प्रस्तावित पुनर्रचित प्रमाणासह ४,८०० कोटी रुपये अशा सुसह्य़ पातळीवर आणण्याचे निश्चित केले गेले.

जीटीएल इन्फ्राच्या समूहातील विविध कंपन्यांच्या मालकीच्या मनोऱ्यांवर ३१ मार्च २०१७ अखेर ५०,८०० दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्या वापरकर्ते म्हणून करारबद्ध आहेत. २०१८-१९ पर्यंत ही संख्या ६०,००० वर जाणे अपेक्षित आहे. म्हणजेच जीटीएल इन्फ्राला पुढील १२ ते १८ महिन्यांत १,३०० ते १,४०० कोटी रुपयांचे करपूर्व उत्पन्न कमावता येईल, असे कंपनीच्या सूत्रांनी परतफेडीचा विश्वास व्यक्त करताना स्पष्ट केले.

कालबद्ध स्वरूपात धनको संस्थांना  कर्ज रकमेची संपूर्ण परतफेड आणि भांडवली मालकीवरही अधिकतम मूल्य प्रदान करणारा हा पहिलाच प्रसंग असेल.  – मनोज तिरोडकर, जीटीएल इन्फ्राचे जागतिक समूह अध्यक्ष