रुग्णालयात २४ तासांपेक्षा जास्त काळ राहावे लागले तर त्या उपचार खर्चाना तुमच्या आरोग्यविम्यातून भरपाई मिळते. परंतु बहुतांश ग्राहकांना त्यांच्या वैद्यकीय विम्याचे यापेक्षा अधिक मोल असायला हवे आणि त्यात बाह्य़ रुग्ण विभागाच्या (ओपीडी) उपचारांचाही खर्च सामावला जायला हवा, असे वाटते.
एखादा रुग्ण रुग्णालयात काही उपचार घेत असेल तर त्याची रवानगी अधिकतर प्रमाणात ‘ओपीडी’ किंवा बाह्य़रुग्ण विभागातील उपचारांतर्गत होते. या खर्चाची तरतूद आरोग्य विमा पॉलिसीतून वगळण्यात आलेली असते. नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीत बाह्य़ रुग्ण विभागातील उपचार हे आरोग्य विमा पॉलिसीत समाविष्ट नसतात.
असे असले तरी आता ग्राहकांची अपेक्षा बदलते आहे. त्यामुळेच आता काही पॉलिसींमध्ये या बाह्य़ रुग्ण विभागाच्या खर्चाचा समावेश केला जात आहे. यापकी बऱ्याचदा याबाबतच्या मर्यादा आधीच स्पष्ट केलेल्या असतात.
साधारणपणे विस्तारित कवच पुढीलप्रमाणे असते :
– वैद्यकीय समपुदेशन शुल्क : एखाद्या विमा योजनेनुसार समुपदेशनाची आकडेवारी अवलंबून असते.
– औषध खर्च : रक्तचाचणी, अल्ट्रासाऊंड, एमआरआय, एक्स-रे इत्यादी निदान करण्यासाठीच्या चाचण्यांना पॉलिसीअंतर्गत बाह्य़ रुग्ण विभागातून फायदेशीर कवच मिळते.
– विशिष्ट उपचार : विशेष दंत उपचार, चष्मा किंवा कॉण्टॅक्ट लेन्ससारखे डोळ्यांसंबंधीच्या उपचारांचा काही ठरावीक पॉलिसींमध्ये मर्यादेत समावेश करण्यात आला आहे.
पॉलिसीच्या एकूण फायद्याच्या मर्यादेवर किंवा पॉलिसीत ठरवलेल्या काही ठरावीक रकमेवर बाह्य़रुग्ण उपचारांचा खर्च हा नेहमीच काही टक्क्यांपर्यंत मर्यादित असतो.
जेव्हापासून बाह्य़ रुग्ण विभागाचा खर्च होण्याची शक्यता वाढली आहे आणि विमाधारकांपासून तो वापरण्याची शक्यताही वाढली आहे तेव्हापासून बाह्य़ रुग्ण विभाग विस्तार किंवा विमा कवचाकरिता किंमतही अधिक मोजावी लागत आहे. रुग्ण उपचार घेत असतानाच्या पॉलिसीच्या नियमित सुरक्षा कवचापेक्षा बाह्य़ रुग्ण विभागांतर्गत घेतलेले कवच, त्याच्या दाव्यांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असेल. यामुळे नियमित आरोग्य विमा पॉलिसीपेक्षा हे बाह्य़ रुग्ण विभाग कवच जास्त महाग असेल.
बाह्य़ रुग्ण विभागातील उपचार हे रुग्णालय जाळ्यातून ‘कॅशलेस’ केल्यास आणि या प्रमाणात खर्चावर नियंत्रण आणल्यास हा खर्च नियंत्रित करता येऊ शकतो आणि बाह्य़ रुग्ण विभागाचा विमा कवच विस्तार हा ग्राहकप्रधान करता येऊ शकतो.
उदाहरणार्थ, डॉक्टरांचा गट किंवा रुग्णालये, औषध विक्री केंद्रे आणि निदान दालने साखळी आदींच्या सहकार्यातून बाह्य़ रुग्ण विभागाचा खर्च हा नियंत्रित करता येऊ शकतो. यानंतर बाह्य़ रुग्ण विभाग विमा कवच व त्याच्या प्रीमियमचा खर्च हा सगळ्यात कमी असेल.
भविष्यात कदाचित स्वतंत्र बाह्य़ रुग्ण विभाग सुरक्षा कवचसुद्धा आखले जातील आणि डॉक्टर आणि निदान केंद्रे आणि औषध कंपन्या यांच्या शृंखलेतून ती बाजारपेठांमध्येही उपलब्ध करून दिली जातील. यासारख्या सुविधा या सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावरून शक्य होऊ शकतात.
सुरक्षाकवच आकर्षक आणि ग्राहकप्रधान करण्यासाठी काही बाह्य़ रुग्ण विभागांचे विमा कवच विस्तार हे विभागाच्या विनावापराचे फायदे पुरवतात. असे लाभ हे पुढील वर्षीही तसेच वापरता येतील. वापरला न गेलेला हा भाग विमा वाढीच्या विस्ताराकरिता मुळीच तोटय़ाचा नाही आणि ग्राहकांकडून त्याचे स्वागतच होईल.
सध्या, प्राप्तिकराच्या कलम ८०डी अंतर्गत कर वजावटीचा फायदा मिळावा व विमाधारकांना मदत व्हावी यासाठी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. यात त्यांना आरोग्य विम्याच्या प्रीमियमचे दावे कापून घेण्याची परवानगी मिळते. जास्तीत जास्त कर वाचवायचा हा मुख्य हेतू असेल, तर अशा योजनांचा नक्कीच विचार व्हायला हवा.
(लेखक स्टार हेल्थ इन्शुरन्स प्रा. लि.चे वरिष्ठ कार्यकारी संचालक आहेत.)

condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?