आज भारताच्या एकूण लोकसंख्येपकी ८१ टक्के लोक मोबाइल फोन वापरतात. २०१३ सालात इंटरनेट वापरणारी भारतीय लोकसंख्या ही २१ कोटींच्या घरात जाण्यासह ११ कोटी भारतीय मोबाइल इंटरनेटचा वापर करत आहेत. माहिती, स्पष्टीकरण, समीक्षा – सर्व काही आपणास आवश्यक असलेल्या गोष्टी आता कळ दाबल्यासरखी उपलब्ध होत आहेत. इंटरनेटद्वारे विम्याच्या विक्रीला याचवेळी सुरुवात झाली.

जीवन विमा ही व्यक्तिगत आर्थिक नियोजनामधील पहिली पायरी आहे. शुद्ध मुदत विमा अर्थात टर्म इन्शुरन्स कमावत्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबाचे अल्प मूल्यामध्ये आíथकदृष्टय़ा संरक्षण करतो. जर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेण्यास उत्सुक असाल, तर ते तुम्ही दोन पद्धतीने करु शकता – ऑनलाइन व ऑफलाइन. विविध कारणांमुळे ऑनलाइन विमा खरेदी मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झालेली आहे आणि त्याला काही कारणेही आहेत.   
ऑनलाइन टर्म इन्शुरन्स प्लॅन्स घेतल्याने काही अतिरिक्त लाभ निश्चितच मिळतात.  
खर्च: टर्म इन्शुरन्स प्लॅन ठरविताना प्रमुख बाब म्हणजे खर्च. बहुतेक ऑनलाइन टर्म प्लॅन्स हे त्याच्या ऑफलाइन समकक्ष पॉलिसींच्या तुलनेत ५० ते ७० टक्क्यांनी (किंवा याहून अधिक) स्वस्त आहेत. आता, यासाठी प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे –    
१या प्रक्रियेमध्ये कोणत्याही मध्यस्थ व्यक्ती अर्थात विमा सल्लागाराचा समावेश नसतो. तुम्ही प्रत्यक्षपणे कंपनीसोबत व्यवहार करता आणि म्हणून कंपनीचा खर्च ऑफलाइन पद्धतीच्या तुलनेत कमी आहे.
२कंपनीची धारणा असते की, मृत्यूचा जोखीम (मॉरटॅलिटी रिस्क) ऑफलाइन ग्राहकांच्या तुलनेत ऑनलाइन ग्राहकांसाठी कमी असतो. परिणामत: कंपनी ऑनलाइन प्रक्रियेत कमी प्रीमिअमची ऑफर देण्यास तयार असते.  

लवचीकता: ऑनलाइन प्रक्रिया निश्चितच तुम्हाला गरजेनुसार योग्य प्लॅन निवडण्यामध्ये अधिक लवचीकता व अधिक पर्याय प्रदान करते. त्यामुळे तुम्हाला ‘स्वत:हून’ पूर्वतयारी करण्याची संधी मिळते. शेवटी तुमची, तुमच्या ध्येयाची आणि तुमच्या जबाबदारीची इतरांना जाण नसते, जे तुम्हालाच अधिक माहित असतात.   
गैरविक्री-फसवेगिरीची शक्यतादेखील नाही. कारण तुमचा अर्ज तुम्हाला स्वत:हून भरायचा असतो. म्हणून अर्जाची पूर्तता व अचूकता याच्या खात्रीसाठी तुम्हाला संधी उपलब्ध होते. अर्थात तुम्ही भरलेली माहिती ही पूर्ण सत्य व वास्तव असल्यास ही प्रक्रिया योग्य त्या वेळी ‘क्लेम’ (दावा निवारण) मिळविण्यापर्यंत चालू राहते.  

सुविधा: ऑनलाइन प्रक्रिया ही ऑफलाइनपेक्षा विनासायास व वेळेची बचत करणारी आहे. तुम्ही तुमच्या सुलभतेनुसार माहिती मिळवू शकता आणि कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही वेळी तुम्ही प्लॅन खरेदी करू शकता.

निष्कर्ष: तुम्ही जीवनातील एका दुर्दैवी प्रसंगासंदर्भात तुमच्या प्रियजनांच्या आíथक भवितव्याच्या सोयीसाठी विमा खरेदी करता आणि ऑनलाइन टर्म इन्शुरन्स प्लॅन तुमच्या कौटुंबिक ताळेबंदावर अतिरिक्त ताण न देता तुमच्या जीवनाला अनेकांगाने अधिक आनंदी करतो.
(लेखक इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी आहेत.)