अपारंपरिक ऊर्जा, संरक्षण तसेच स्मार्ट शहरे आदी क्षेत्रात संयुक्तरित्या कार्य करण्यासाठी भारत – अमेरिकेतील उद्योग चाचपणी करत आहेत. याबाबतची एक बैठक मंगळवारी नवी दिल्लीत होत आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री हे या भारताच्या वतीने या बैठकीचे नेतृत्व करतील. तर हनीवेल इंटरनॅशनलचे अध्यक्ष डी. कोट हे अमेरिकेच्या बाजुने आपली मते मांडतील. या दरम्यान काही करारही होण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रासाठी केंद्र सरकारतर्फे राबविले जाणारी धोरणे आणि त्यादृष्टीने उद्योगाना असलेली संधी यावर यानिमित्ताने चर्चा करण्यात येणार आहे. दुसऱ्या धोरणात्मक व वाणिज्यिक संवादाचा भाग म्हणून ही बैठक होत असून या क्षेत्रातील कार्यासाठी पावले उचलण्याबाबत मते विचारात घेतली जाणार आहेत.