महागाई सप्टेंबर ४.४१%

अन्नधान्याच्या किंमती वधारल्याने गेल्या महिन्यातील महागाई दर पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. किरकोळ किंमत निर्देशांकावर सप्टेंबरमधील महागाई दर हा ४.४१ टक्क्य़ांवर गेला आहे. आधीच्या, ऑगस्टमध्ये हा दर ३.७४ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१४ मध्ये हा दर ५.६३ टक्के होता.

सप्टेंबरमध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर वाढून ३.८८ टक्के झाला आहे. आधीच्या महिन्यात तो २.२० टक्के होता.
गेल्या महिन्यात डाळींच्या किंमती वाढून २९.७६ टक्के झाल्या. तर मसाल्यांचे पदार्थ हे १.३८ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहेत.
मटण, मासे आदी पदार्थ घसरून ५.५९ टक्क्य़ांवर आले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थही ५.०५ टक्क्य़ांपर्यंत कमी झाले आहेत. अंडय़ाचे दरही कमी होत १.१९ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहेत.

घसरत्या महागाईपाठोपाठ उंचावलेल्या औद्योगिक उत्पादन दरामुळे भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे मानले जात आहे.
अर्थव्यवस्थेच्या वेगासाठी तमाम उद्योग क्षेत्राकडून आवश्यकता प्रतिपादन केलेली रिझव्‍‌र्ह बँकेची दर कपात यंदाच्या ऐन सणांच्या तोंडावरच लागू झाली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहनपूरक हे वृत्त असल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या अप्रत्यक्ष कर संकलनातही वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहेत.