संथ आर्थिक विकासाबरोबरच दमदार मान्सून आणि सावरणाऱ्या महागाईच्या छायेत अखेर दिवाळी सुरू झाली. या दिवाळीतील हा तुमच्यासाठीचा गुंतवणूक फराळ..

अनेक गुंतवणूकदार बँकांचे व्याजदर कमी झाल्याने आपली बचत म्युच्युअल फंडांकडे वळवीत आहेत. बहुसंख्य गुंतवणूक दरांनी या साठी बॅलंस्ड फंडांचा पर्याय निवडला दिसत आहे. पहिल्यांदाच गुंतवणूक करणारम्य़ा गुंतवणूकदारांसाठी बॅलंस्ड फंडाची निवड करणे हा खचितच चांगला पर्याय नव्हे. पहिल्यांदा गुंतवणूक करणारम्य़ा गुंतवणूकदारांनी इक्विटी सेव्हिंग्ज फंडांची निवड करणे हिताचे ठरेल. इक्विटी सेव्हिंग्ज फंड हे लिक्वीड फंडांपेक्षा थोडे अधिक जोखमीचे असले तरी बॅलंस्ड फंडांपेक्षा कमी जोखमीचे आहेत. तेव्हा कष्टाने मिळविला बोनस गुंतविण्यापूर्वी आपल्या जोखमीची निष्टिद्धr(१५५)ती करणे गरजेचे आहे. ज्यांची जोखीम क्षमता अधिक आहे, आणि या आधी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा अनुभव घेतला आहे. अशा गुंतवणूकदरांनी नक्कीच बॅलंस्ड फंडाचा विचार करायला हरकत नाही.

ज्या गुंतवणूकदारांना संपत्तीच्या निर्मितीसाठी दीर्घ कालीन गुंतवणुक करण्याची इच्छा आहे त्यांनी  लार्जकॅप गुंतवणुकीचा पर्याय निवडणे गरजेचे आहे. दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी  सध्याच्या मुल्यांकनानुसार लार्जकॅप फंडाची निवड करणे गरजेचे आहे. ही निवड केल्यानंतर ही गुंतवणूक किमान ६ ते ९ महिने कालावधीच्या एसटीपीच्या माध्यमातून करणे हिताचे ठरेल. मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही

सेबीनेमागील आठवडय़ात म्युच्युअल फंडाचे वर्गीकरणासाठी नवीन नियम तयार केले आहेत. ज्या गुंतवणूकदरांची समभाग गुंतवणुकीची जोखीम स्वीकारण्याची इच्छा नसेल आणि गुंतवणुकीचा कालावधी ३ वर्षे असेल अशा गुंतवणूकदारांनी मिडीयम टर्म इंकम फंडांची निवड करावी. या फंडातील गुंतवणूक कमी जोखमीची बँकेच्या मुदत ठेवी पेक्षा अधिक भांडवली वृद्धी देणारी आणि गुंतवणुकीचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक असल्याने बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा करकार्यक्षम असेल.

(लेखक टाटा असेट मॅनेजमेंट कंपनीचे उत्पादन प्रमुख आहेत.)