बरोब्बर आठवडाभराने सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षांपासून सुरू होत असलेल्या विविध गुंतवणूक – बचत योजना तसेच नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर सूट – सवलती याविषयीचे सविस्तर विवेचन यंदाच्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ विशेषांकात आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘नातू परांजपे – इशान ड्रिम बिल्ड प्रा. लि.’ आणि ‘कोटक म्युच्युअल फंड’ सहप्रायोजक असलेला हा अंक शुक्रवारी, २७ मार्च रोजी प्रकाशित होत आहे. यानंतर तो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘सुकन्या – समृद्धी’ योजना ताज्या अर्थसंकल्पाच्या रूपाने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अधिक आकर्षित केली आहे. तिला कर सवलतीचे कोंदणही देण्यात आले आहे. तिच्यासह भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरतील अशा योजनांचा सविस्तर परामर्श अर्थकारणाचे परब्रह्म उलगडून दाखविणाऱ्या या अंकात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मूळ प्राप्तिकर मर्यादा स्थिर ठेवण्यात आली असली तरी तब्बल ४.४४ लाख रुपयांपर्यंतचे कर सवलतीचे विविध पदर या अंकातून उलगडून दाखविण्यात आले आहेत.
एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती योजना, पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी आदी गुंतवणुकीशी निगडित अन्य मार्गही या अंकात सोदाहरण व ठळक आकडेवारीसह देण्यात आले आहेत. नव्याने सुरू झालेले किसान विकासपत्राचे यंदाचे स्वरूप तसेच रोखे आदी स्थिर पर्यायांतील गुंतवणूक अधिक वैशिष्टय़पूर्णरीत्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’मध्ये विशद करण्यात आली आहे. संबंधित विषय आणि त्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे विशेष लेख त्यात आहेत.