पावसाबाबत अनिश्चिततेचे सावट सरले आहे आणि महत्त्वाच्या आíथक सुधारणा मार्गी लावणाऱ्या यंदाच्या अधिवेशनाच्या पाश्र्वभूमिवर भांडवली आणि रोखे बाजार भावनिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळ्यांभोवती फेर धरताना दिसत आहेत. ग्रीस, चीनमधील घडामोडींपोटी निर्माण झालेल्या अस्वस्थेतून सावरलेल्या बाजारात गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल कसे पडावे, हे सुचविणारा लेख..
चंद्रेश निगम
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितेने गेल्या काही दिवसांत बाजाराला घेरलेले दिसून येते. ग्रीसव्यतिरिक्त जागतिक भांडवली बाजाराला भंडावून सोडणारे संकट चीनच्या रूपाने उभे राहिले. चीनच्या भांडवली बाजाराला त्या आधी काही बडय़ा कंपन्यांच्या भागविक्रींचा उन्माद चढला होता. तर पुढे विक्रीचा नृशंस मारा सुरू झाला आणि बाजार त्याच्या नजीकच्या कळसापासून जवळपास ३० टक्क्यांनी गडगडला. या थरकाप उडविणाऱ्या जागतिक घडामोडी आणि त्या बद्दलच्या अनिश्चिततांची टांगत्या तलवारीने अनेक बाजारांमधील तेजीचा घात केला आणि अमेरिका, युरोप आणि भारतासारख्या उद्योन्मुख बाजारपेठांमध्ये निर्देशांकांत तीव्र स्वरूपाचा उतार जूनमध्ये दिसून आला.
स्थानिक बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या आघाडीच्या निर्देशांकांमध्ये मार्च-एप्रिलमध्ये वादळी वध-घटीनंतर पुन्हा सरलेल्या महिन्यांने धडकी भरवेल अशा उलथापालथींचा प्रत्यय दिला. पण निर्देशांकांच्या या तीव्र हालचालीत एक गोष्ट दुर्लक्षित राहिली ती म्हणजे विशिष्ट उद्योगक्षेत्र आणि समभागांमध्ये गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. बाजाराच्या या घसरणक्रमातही व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांचा समभागांच्या खरेदीतील स्वारस्य ढळल्याचे आढळून आले नाही. म्यच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये निरंतर गुंतवणुकीचा ओघ सुरूच राहिला. तर दुसऱ्या बाजूला विदेशी गुंतवणूकदार हे विक्रेत्याच्या भूमिकेत होते. जरी ते त्यांची आधी ज्या प्रचंड प्रमाणात गुंतवणूक झाली आहे त्या तुलनेत त्यांच्या या निर्गुतवणुकीचे प्रमाण कमी असले तरी त्यांच्या विक्रीपेक्षा सरस खरेदी देशांतर्गत गुंतवणूकदार, फंड व वित्तसंस्थांकडून सुरू होती. आपल्या बाजाराबाबत अभावानेच दिसून येणारी ही गोष्ट होती.
विदेशातून येणारा ओघ आटण्याला अनिश्चित जागतिक घडामोडी कारणीभूत होत्या. तर देशांतर्गत गुंतवणूक अढळ राहण्यामागे देशी अर्थव्यवस्थेबद्दलची आस्था हे स्वाभाविक कारण होते. अर्थव्यवस्थेतील उभारी सशक्त पायावर सुरू असून, आगामी काळात कंपन्यांच्या आíथक कामगिरीलाही सुधारणा दाखविणारी कलाटणी मिळेल याबद्दलचा विश्वास यातून दिसून आला. अलिकडच्या विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीतून उलट येथील बाजाराचे मूल्यांकन ताळ्यावर आणणारा सुपरिणाम घडवून आणला. त्यामुळे मध्यम ते दीर्घ कालावधीबाबत समभाग बाजाराबद्दल दृष्टिकोन सकारात्मकच व तेजीचाच असायला हवा. गुंतवणूकदारांनी अशा समयी आपली आíथक उद्दिष्टे, त्यांच्या पूर्ततेसाठी उपलब्ध असलेला कालावधी आणि जोखीम सोसण्याची क्षमता यानुरूप आपल्याजवळच्या गुंतवणूकयोग्य पूंजीचे विविध मालमत्ता पर्यायांमध्ये सुयोग्य विभाजन करावे. गेल्या महिन्यात रोखे बाजारातही प्रचंड वध-घट दिसून आली. या बाजारावर मंदीचे सावट दिसून आले आणि रोख्यांच्या परतावा दराने रिझव्‍‌र्ह बँकेच्या ३ जून रोजीच्या दर कपातीपूर्वीचा कळस गाठल्याचे दिसून आले.
सरकारने विशिष्ट पिकांसाठी किमान हमी भावात वाढीचा निर्णय जूनच्या प्रारंभी घेतला. परंतु वाढीची मात्रा माफक राखण्याची आíथक शिस्त सरकारने दाखविली. त्यामुळे मान्सून अपेक्षेइतका न झाल्यास अन्नधान्याच्या किमतीचा भडका होणार नाही याची काळजी घेतली गेली. प्रत्यक्षात मान्सूनचे दमदार आगमन झाले आणि जशी भाकीतं गेली होती त्यापेक्षा यंदा पाऊस चांगला राहण्याची उमेद वाढली आहे. तर दुसरया बाजूला चीनमधील प्रतिकूल घटनाक्रमामुळे सोने आणि कच्चे तेल यांच्या आंतरराष्ट्रीय किमतीत नरमाई दिसून आली. हा परिणाम आपल्या पथ्यावरच पडणाराच ठरला.
रिझव्‍‌र्ह बँकेने रोखे लिलावाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला असताना, विदेशी गुंतवणूकदारांचे घटलेले स्वारस्य चिंतेचा विषय होता. त्या उलट म्युच्युअल फंडांची खरेदीही नरमली असली तरी भविष्यनिर्वाह निधी आणि बँकांकडून चढाओढीने सुरूच राहिलेली दिसून आले. अशीही वदंता होती की, रिझव्‍‌र्ह विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या रोखे खरेदीच्या रुपयातील खरेदीवर मर्यादा राखण्याच्या प्रयत्न डॉलरमधील खरेदीवर मात्र कोणतेही र्निबध नसतील. यातून जी-सेकमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढण्यास आणखी वाव निश्चित निर्माण केला जाईल.
महागाईचे दरातदेखील रोखे बाजाराच्या दृष्टीने अनुकूलतेत सातत्य आढळून आले आहे. ग्राहक किमतीवर आधारित महागाई दर हे त्यातील अन्नधान्य आणि गाभा घटक दोहोंबाबत अद्याप समाधानकारक आहेत.
आगामी काळात मध्यवर्ती बँकेकडून संभाव्य व्याज दर कपात ही ग्राहक किंमतीवर महागाईचा दराचा प्रक्षेपपथ, चलनातील हालचाल, आयातीत वस्तूंच्या किमती आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेची स्थिती या गोष्टींवर अवलंबून राहील. या सर्व आघाडय़ांवर नजीकच्या काळात प्रतिकूलतेची स्थिती अद्याप तरी दिसून येत नाही.

लेखक ‘अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
व्याजदर कपातीची सबळ शक्यता
रोखे बाजाराचा व्याज दर कपातीच्या शक्यतेबाबत नकारात्मक कल स्पष्टपणे दिसून येत आहे. ऑगस्टमधील रिझव्‍‌र्ह बँकेची मध्य-तिमाही पतधोरण आढावा नजीक येऊन ठेपला असताना, प्रत्यक्षात रोख्यांचे परतावा दर उंचावत जाणे हे निराशावादाकडे बोट दाखविणारे आहे. पण ऑगस्टमध्ये नव्हे तर डिसेंबपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेकडून दर कपात केली जाईल, अशी सबळ शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सल्ला हाच की, ज्यांना अधिक धोके पत्करण्यास मुभा आहे त्यांनी आपल्या रोखे गुंतवणूक भांडाराला अधिक कालावधी नि:संशय बहाल करावा, मात्र जोखीम टाळू पाहणारया गुंतवणूकदारांना प्राप्त परिस्थितीत अल्पमुदतीच्या रोख्यांकडे निश्चितपणे पाहता येईल.