मसाल्यांच्या क्षेत्रातील अमेरिकास्थित जागतिक स्तरावरील अग्रणी समूह ‘मॅकॉर्मिक अँड कंपनी इन्क’ने कोहिनूर स्पेशालिटी फूड्स इंडियाच्या भारतातील बासमती तांदळाचा व्यवसाय संपूर्णपणे हस्तगत केला आहे. मॅकॉर्मिकने उर्वरित १५ टक्के समभागांची मालकी कोहिनूर फूड्स लिमिटेडकडून स्वत:कडे घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. या निर्णयामुळे बासमती तांदळाच्या भारतातील सर्वोत्तम ब्रँड्सपैकी एक असलेल्या ‘कोहिनूर’ची १०० टक्के मालकी मॅकॉर्मिककडे जाणार आहे.

सप्टेंबर २०११ मध्ये मॅकॉर्मिकने केएसएफच्या ८५ टक्के मालकीसह ‘कोहिनूर’ ब्रँड आणि इतर ट्रेडमार्क विकत घेतले होते. या घडामोडींमुळे मॅकॉर्मिकला भारतीय बाजारपेठेत आपला विस्तार करण्यासाठी तसेच गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. मॅकॉर्मिकने १९९४ सालापासून भारतात १५ कोटींहून अधिक डॉलरची गुंतवणूक केली आहे. आजघडीला ही कंपनी येथील दोन हजारांहून अधिक लोकांना रोजगार देत आहे.

Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड
adani green, investigation by american agencies
अमेरिकेतील चौकशीशी कसलाही संबंध नसल्याचा ‘अदानी ग्रीन’चा खुलासा; त्रयस्थ कंपनीशी निगडित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा दावा

कंपनीच्या दक्षिण भारतात सुरू असलेल्या दोन संयुक्त प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान वापरले जात आहे व भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी उच्च दर्जाच्या मसाल्यांची निर्मिती तेथे केली जात आहे.

मॅकॉर्मिकच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे अध्यक्ष माल्कम स्विफ्ट यांच्या मते, ‘उदयोन्मुख बाजारपेठ असलेल्या भारतामध्ये कंपनीसाठी वाढीच्या उत्साहवर्धक संधी दिसत आहेत. गेली दोन दशके आम्ही भारतामध्ये सातत्याने गुंतवणूक करीत आहोत आणि या बाजारातील ‘कोहिनूर’ ब्रँडशी आमची सखोल बांधिलकी तयार झाली आहे. आता आम्हाला ‘कोहिनूर’ ब्रँडच्या केवळ बासमती तांदळाशी जोडलेल्या ओळखीचा आणखी विस्तार करायचा आहे.’ मॅकॉर्मिकचे मसाले निर्मिती क्षेत्रातील स्वारस्य पाहता कोहिनूर हे ‘तांदूळ आणि मसाले’ (राइस अँड स्पाइस) बाजारपेठेतील एक ठळक नाव बनविण्याचे कंपनीने लक्ष्य ठेवले आहे.