‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ असे बिरुद मिरविणाऱ्या एलआयसीने या बिरुदास पात्र असल्याचा विश्वास आपल्या विमाधारकांना दिला आहे. विमा नियमन व विकास प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’ने २०१२-१३साठी जाहीर केलेल्या आकडेवारीत विमाधारकांनी केलेले दावे स्वीकारण्यात एलआयसी अव्वल ठरली आहे. २०१२-१३ या वर्षांत एलआयसीने दायित्व स्वीकारल्याची टक्केवारी ९५.६६ आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टार युनियन दाइची असून तिची दावे स्वीकारण्याची टक्केवारी ८०.०६ आहे. तिसऱ्या क्रमांकावर सहारा लाइफ असून त्यांची टक्केवारी ८३.२० अशी आहे, पण दोन्ही कंपन्यांच्या पॉलिसीधारकांचे प्रमाण एलआयसीच्या तुलनेत खूप कमी व नगण्य आहे.  
‘इर्डा’च्या वार्षकि अहवालानुसार निकालात न काढलेल्या दाव्याची खासगी विमा कंपन्यांची टक्केवारी ६.२४ आहे तर एलआयसीची हीच टक्केवारी १.९६ आहे. जेव्हा घरातील कर्त्यां माणसाच्या निधनामुळे त्या कुटुंबाचे उत्पन्न थांबते अशा वेळी विम्याचा दावा लवकरात लवकर स्वीकारून विम्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस लवकरात लवकर दाव्याची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. तीन महिन्यांच्या आत, तीन ते सहा महिने व सहा महिन्यांहून अधिक अशी दाव्यांची वर्गवारी केली आहे. या तिन्ही वर्गवारीत एलआयसी अव्वल असल्याचे सिद्ध होते.
दावे नाकारले जाणे अथवा रक्कम देण्यास वेळ लागणे याचे एक प्रमुख कारण विमा घेतेवेळी खोटी माहिती देणे अथवा महत्त्वाचा आजार दडविणे हे आहे. खासगी विमा कंपन्या अनेकदा नसíगक आपत्ती, अतिरेकी हल्ला आदी कारणांनी मृत्यू झाल्यास खासगी कंपन्या विमा योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून दावे नाकारतात. परंतु नसíगक आपत्ती, खून अतिरेकी हल्ला या कारणाने पॉलिसीधारकाचा मृत्यू     झाल्यावरही एलआयसीने मानवी दृष्टिकोनातून वारसांना पसे दिले असल्याची अनेक उदाहरणे आहेत.