मौल्यवान वस्तूंचा विमा उतरवताना आपल्यापकी कोणीही मागे-पुढे पाहत नाही; पण आपल्याकडच्या सगळ्यात मौल्यवान मालमत्तेच्या संरक्षणाचे काय? ही मालमत्ता म्हणजे तुम्ही स्वत:! तुम्ही एखाद्या अपघातात सापडला आणि नंतर काम करू शकला नाही तर तुमच्या वैद्यकीय देयकांचा भार कोण उचलणार? तुमची कर्जे, तारण, तुमचे घर चालवण्याचा रोजचा खर्च यांचे काय? तुम्ही कार्यालयीन कामासाठी जेव्हा एखादा आठवडा बाहेर जाता तेव्हा पत्नीच्या हातात अतिरिक्त पैसे ठेवता. तुम्ही परत येईपर्यंतच्या काळात तिला कोणतीही आíथक अडचण सहन करायला लागू नये यासाठीच. मात्र आपण कधीही घरी परत येणार नसू तर आपल्या पत्नीच्या हातात किती रक्कम सोपवून जायला हवे, याचा कधी विचार केला आहे का? विम्याच्या संदर्भात नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आताच काळजी घेतलेली बरी, हा जुन्याजाणत्यांचा सल्ला प्रकर्षांने लागू पडतो.
गरजेपेक्षा कमी विम्याची साथ
भारतीयांना सर्वात मोठा सुरक्षा धोका आहे तो गरजेपेक्षा कमी विमा काढण्याच्या साथीचा. बहुसंख्य भारतीयांकडे विम्याचे पुरेसे छत्रच नसते. त्याहून वाईट बाब म्हणजे अनेकांकडे विमाच नसतो.
आपल्याला माणूस म्हणून आपल्या जिव्हाळय़ाच्या व्यक्तीच्या संभाव्य आजारांचा किंवा मृत्यूचा विचार करायला आवडत नाही. आपल्याबाबतीत वाईट गोष्ट घडावी, अशी अपेक्षा कोणालाच नसते. मात्र संकटाच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहिलात तर तुम्हाला आíथक विवंचनांपासून संरक्षण मिळते. विमा हा कोणत्याही आíथक योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खरेतर पसा कमावण्यापेक्षा आहे तो पसा सांभाळून ठेवणे हे अधिक सोपे आणि स्वस्त पडते. एक र्सवकष आíथक योजना तीच असते, जी पसा वाढवण्याबरोबरच तो सांभाळण्याचाही विचार करते. जीवन विमा हा तुमच्यासाठी जे सर्वात महत्त्वाचे आहे त्याचे रक्षण करण्याच्या सर्वोत्तम मार्गापकी एक आहे. व्यावहारिक पातळीवर बोलायचे तर विमा म्हणजे काही विपरीत घडलेच तर तुमचे, तुमच्या प्रियजनांचे आणि तुमच्या जीवनशैलीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने जोखमींचे व्यवस्थापन होय. यात एकच भाग थोडा अवघड असतो. तुमच्या विम्याच्या गरजा नेमक्या ओळखणे आणि तुमचा किती रकमेचा विमा उतरवायला हवा, हे निश्चित करणे.
किती रकमेचा विमा ठरेल पुरेसा?
आपल्याकडील नाशवंत मालमत्तेचे मूल्य ठरवणे सोपे असले तरी आपल्या स्वत:ची आणि आपल्या जीवनशैलीची किंमत कशी ठरवणार? विमा संरक्षणाची पातळी ठरवणे अवघड असले तरी विमा योजनेचा विचार करताना ज्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, अशा या काही गोष्टी पाहा –
*तुमचा अचानक मृत्यू झाल्यास कर्जफेड करण्यासाठी किती रक्कम हवी आहे?
*तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांना जगण्यासाठी किती रक्कम आवश्यक आहे?
*तुम्ही अपंग झालात तर घरात बदल करण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी किती खर्च येईल आणि तुमची जीवनशैली सांभाळण्यासाठी किती पसे लागतील?
*तुम्हाला कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार झाला तर तुमच्या उपचारांवर किती खर्च येईल, जो तुमच्या सध्याच्या जीवनशैलीच्या खर्चापेक्षा जास्त असेल?
*काही काळ कामच करता येणार नाही, अशी तुमची स्थिती झाली, तर तुम्हाला किती रक्कम लागेल? वाढीव काळासाठी आवश्यक इतक्या आजारपणाच्या रजा तुमच्याकडे आहेत का?
हे प्रश्न जरा ‘अती’च वाटले तरी तुमच्यासाठी एक भक्कम संरक्षण योजना बनविण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. तुमच्या व्यक्तिगत गरजा, भविष्यातील उद्दिष्टे आणि लक्ष्ये यांचा विचार करून तुमच्यासाठी किती रकमेचे संरक्षण योग्य राहील, हे तुमचे आíथक सल्लागार ठरवू शकतील.
व्यावहारिकदृष्टय़ा सांगायचे तर आपल्या जिव्हाळय़ाच्या व्यक्तींच्या डोक्यावर कर्जाचा भार ठेवू नका आणि जीवनविम्याचे छत्र तुमच्या वार्षकि पगाराच्या दुप्पट असावे, या मिथकातून मुक्त व्हा.
आकडेवारी काय सांगते?
*पाचपकी एका कुटुंबातील एका पालकाचा मृत्यू झाला, गंभीर अपघात झाला किंवा पालकाला काम करता येणार नाही असा आजार झाला, तर त्या कुटुंबावर आघात होईल.
*एका पालकाला गंभीर आजार, अपघात झाल्यास किंवा मृत्यू आल्यास कोणत्याही भारतीय कुटुंबात विम्याचे संरक्षण अपुरे असल्यामुळे किमान अध्र्याने किंवा त्याहूनही अधिक प्रमाणात त्या कुटुंबाचे उत्पन्न घटेल.
*९५ टक्के कुटुंबांकडे पुरेसे विमा संरक्षण नसते.
(लेखक अ‍ॅगॉन रेलिगेअर लाइफ इन्शुरन्सचे मुख्य संस्था अधिकारी आहेत.)