डोंबिवलीत आज मार्गदर्शनपर उपक्रम

‘उच्चांकी ३० हजाराच्या शिखराला गाठू पाहणारा सेन्सेक्स, घटलेल्या व्याजदरामुळे मुदत ठेवींसह रोख्यांचा कमी होत गेलेला परतावा अशी स्थिती असताना भविष्यातील गुंतवणुकीचा कल  काय असावा, हे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून तज्ज्ञ सल्लागार डोंबिवलीकरांना मार्गदर्शन करणार आहेत.

यासाठी निमित्त आहे ‘कोटक म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या नव्या पर्वाचे. गुंतवणूकदारांसाठी योजलेला हा उपक्रम शनिवार, २२ ऑक्टोबर २०१६ रोजी ब्राह्मण सभा, टिळक पथ, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ५.३० वाजता होईल. या कार्यक्रमात गुंतवणूकदारांना उपस्थित तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे.

सनदी लेखाकार तृप्ती राणे या ‘अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती’ कशी साध्य करता येते हे विशद करतील. सुरक्षित आणि माफक परतावा देणारे विविध गुंतवणूक पर्यायांची तोंडओळख करून देण्यासह उत्पन्न, खर्च आणि भविष्यातील आर्थिक निकड यांचे गणित कसे सोडवावे, हे त्या सांगतील.

भांडवली बाजाराबरोबरच लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंड या गुंतवणूक पर्यायाविषयी लोकसत्ता अर्थ वृत्तान्तचे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे यावेळी मार्गदर्शन करतील. ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ सांगताना फंडांचे प्रकार, फंडांची निवड, फंडातील परतावा, त्याचा भांडवली बाजार अथवा अन्य क्षेत्रसंबंधही ते उलगडून दाखवतील. म्युच्युअल फंडांचे कार्य कसे चालते, प्रत्येक फंडाच्या निधी व्यवस्थापकाचे वेगळेपण आणि भूमिका आदी ते विशद करतील.

केव्हा, कुठे?

  • शनिवार, २२ ऑक्टोबर २०१६ सायंकाळी ५.३० वाजता
  • स्थळ : ब्राह्मण सभा, टिळक पथ, डोंबिवली (पूर्व)

तज्ज्ञ मार्गदर्शक :

  • तृप्ती राणे (अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती)
  • वसंत माधव कुलकर्णी (म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे)

अस्वीकृती : Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.