मिहद्र समूहाने एम२ऑलच्या सहाय्याने वेगाने विकसित होत असलेल्या भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेत प्रवेश केला. या  बाजारपेठेत मिहद्रची वाहन क्षेत्रातील तसेच अन्य विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध केली जाणार आहे. यामध्ये गेल्याच आठवडय़ात सादर करण्यात आलेली मिहद्र टीयूव्ही ३०० ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहनाची श्रेणीही नोंदणीसाठी उपलब्ध  करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाची घोषणा सोमवारी समूहाने मुंबईत केली. समूहाने एम अँड ए यांच्या मार्गदर्शनाखाली एम२ऑल ही संकल्पना विकसित केली आहे.
एम२ऑलवर मिहद्र व्यवसायाची उत्पादने व सेवांची विक्री केली जाणार आहे तसेच इतर उत्पादक आणि विक्रेत्यांना सवलतीतील उत्पादने व सेवा पुरवल्या जातील. यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनव व्यासपीठ मिळेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एम२ऑलच्या ग्राहकांना मिहद्रची ४०० उत्पादने व सेवा पाहायला मिळतील. पकी ४० सेवांसाठी नोंदणी करता येईल. त्यात समूहाची वाहने, स्थावर मालमत्ता, दुचाकी यांचा समावेश आहे. या मंचावर एका क्लिकच्या सहाय्याने उत्पादने खरेदी करता येणार असून ऑनलाइन उत्पादन खरेदी केल्यानंतर मिहद्रचे भागीदार, त्यांचे वितरक आणि वाहतूक चमू उत्पादन घरपोच देण्यासाठी सहकार्य करतील.
एम२ऑलवर मिहद्र समूहाच्या कंपन्या, बाहेरचे विक्रेते, ऑनलाइन कॅटलॉग व्यवस्थापन, विनाअडथळा शुल्कभरणा सेवा, बिझनेस ईआरपी यंत्रणेसह बॅक एंड इंटिग्रेशन या सेवांचा समावेश असलेले सर्वोत्तम ईकॉमर्स तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंग, डेटा अनालिटिक्स, लॉजिस्टिक्स आणि कॉल सेंटर सेवांसह सपोर्ट सेवा यांचा समावेश आहे.
विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये १६.५ अब्ज डॉलरचा मिहद्र कार्यरत असून ती ट्रॅक्टर्स, युटिलिटी व्हेअकल्स, माहिती तंत्रज्ञान, आíथक सेवा आणि व्हेकेशन ओनरशीप या क्षेत्रांत आघाडीवर आहे.  याशिवाय शेतकी व्यवसाय, एअरोस्पेस कंपोनंट्स, सल्लासेवा, संरक्षण, उर्जा, औद्योगिक उपकरणे, वाहतूक, स्थावर मालमत्ता, रिटेल, स्टील, कमíशयल वाहने आणि दुचाकी व्यवसायात कंपनीचे स्थान मजबूत आहे.