टाटा, महिंद्रकडून माफक दरातील घरांसाठी प्राधान्य दिले गेलेल्या  पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसरमध्ये परिसरातील सर्वात मोठे या गटातील निवासी संकूल साकारण्यात येत आहे. अरुण मुछाला समूहामार्फत ३,००० हजार घरांच्या या संकुलातील पहिला टप्पा यंदाच्या दिवाळीत पूर्ण होणार आहे.
स्थावर मालमत्ता, आदरातिथ्य क्षेत्रातील आघाडीच्या अरुण मुछाला समूहातील साईबाबा बोऊलेवार्ड प्रकल्पांतर्गत एकूण ११० एकर जागेवर ३,००० घरांचे निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. वन बीएचके ते टू१/२बीएचके प्रकारातील तळमजला व दोन मजले अशा इमारतीत असतील.
या एकूण प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पहिला टप्प्यातील घरे यंदाच्या दसरा-दिवाळी दरम्यान उपलब्ध होतील, अशी माहिती कंपनीचे अरुण मुछाला समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मुछाला यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
ही घरे २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीची आहेत. परिसरात आवारात १७ औद्योगिक प्रकल्प, १९५ निवासी संकुल; तसेच ८३२ विक्री दालने असतील. तीन टप्प्यातील हा प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईसर परिसरात सध्या टाटा हाऊसिंग, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रद्वारेही माफक दरातील घरे उभारली गेली आहेत. किंबहुना माफक दरातील पहिला प्रकल्प उभय कंपन्यांनी याच भागातून सुरू केला आहे.

Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
kalyan railway station crime news,
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले