मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील सराफांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ने (पूर्वाश्रमीची बॉम्बे बुलियन असोसिएशन) गुरुवारी नवीन अध्यक्ष म्हणून सुरेश जैन यांची तर उपाध्यक्षपदी अंशुल सोनावाला यांच्या ताबडतोबीने नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले.
आजवर या संघटनेचे अध्यक्षपद सांभाळणारे मोहित कम्बोज यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे या संबंधाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून कम्बोज यांचे नाव प्रसिद्धीझोतात आले.
भाजपकडून तिकीट मिळालेले दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून अपयशी लढत दिलेले कम्बोज यांनी समाजकारण- राजकारणासाठी अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने राजीनामा देत असल्याचे कारण पुढे केले आहे.