वस्त्र निर्मितीतील मॉन्टे कालरेला भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी काहीसा निराशाजनक प्रतिसाद मिळाला. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार तेजीत राहूनही समभागाला मात्र पदार्पणातच फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ६४५ रुपये निश्चित समभाग दराला दिवसअखेर १२.१८ टक्के कमी, ५६६.५० रुपये भाव मिळाला. सत्रात तो तब्बल १८.११ टक्के घसरत ५२८.१५ रुपयेपर्यंत आला होता. कंपनीची भागविक्री प्रक्रिया ५ डिसेंबर रोजी बंद झाली होती. प्रक्रिये दरम्यान ६३० ते ६४५ असा किंमत पट्टा जाहिर केल्यानंतर कंपनीने ६४५ ही सर्वोच्च किंमत निश्चित केली होती. या माध्यमातून ३५०.४३ कोटी रुपये उभारण्यात आले. तर त्यातील १०५ कोटी रुपये हे प्रमुख गुंतवणूकदारांकडून मिळाले. प्राथमिक भागविक्रीला चांगला प्रतिसाद मिळूनही प्रत्यक्ष सूचिबद्ध होताना निराशा करणारी २०१४ मधील मॉन्टे कालरे ही पहिली कंपनी ठरली आहे.
मॉन्टे कालरे फॅशन्स लिमिटेडची मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी नोंदणी करताना कंपनीचे अध्यक्ष जवाहर लाल ओसवाल, कार्यकारी संचालक संदीप जैन.