एमआयपी
आयुर्वम्यिाचे संरक्षण आणि सुरक्षित नियमित उत्पन्नाची हमीही
अगदी आता आतापर्यंत म्हणजे २००८ सालच्या जागतिक आíथक संकटाने तडाखा देईपर्यंत युनिटसंलग्न विमा योजनांनी (युलिप्स) सर्वच विमा ग्राहकांना मोहिनी घातली होती. सर्वच जण या योजनांतून मिळणाऱ्या उत्तम परताव्यांवर खूश होते. त्यानंतर इक्विटी बाजारपेठेत चढउतार सुरू झाले आणि ग्राहकांनी आपले लक्ष पुन्हा एकदा खात्रीशीर परतावे देणाऱ्या पारंपरिक योजनांकडे वळवले. अतिशय सुलभ परतावे देणाऱ्या पारंपरिक उत्पादनांना आलेल्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने विमा पुरवठादारांनी वेगवेगळ्या एन्डोमेंट आणि मनी-बॅक योजना दाखल करण्यास सुरुवात केली.
वेगवेगळ्या संशोधनांतून असे समोर आले आहे की, दीर्घकाळाकरिता नियोजन करताना अनेक ग्राहक जोखीम पत्करणे टाळतात आणि खात्रीशीर परतावे मिळणाऱ्या योजनांना प्राधान्य देतात. त्यामुळे ते युलिप्सपेक्षा पारंपरिक उत्पादनांना पसंती देतात. अनेक ग्राहक आपल्या आíथक उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता एकदाच मिळणाऱ्या मोठय़ा रकमेपेक्षा नियमित तत्त्वावर मिळत राहणाऱ्या उत्पन्नाला प्राधान्य देतात. बाजारपेठेत सध्या गॅरंटीड मंथली इन्कम प्लॅन्स (एमआयपी)ला इतकी मागणी का आहे हे यातून लक्षात यावे.
आपल्या नियमित उत्पन्नाच्या जोडीला पूरक उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या आणि / किंवा निवृत्तीपश्चात आपल्या आíथक गरजा भागवण्याकरिता नियमित उत्पन्न हवे असणाऱ्या ग्राहकांना एमआयपी सुयोग्य ठरावेत. सद्य घडीला बाजारपेठेत अनेक एमआयपी उपलब्ध आहेत आणि तुमच्याकरिता सुयोग्य एमआयपी कोणता हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे.
विमा कंपन्यांचे एमआयपी कशा रीतीने कार्य करतात?
सर्वसाधारणपणे, एमआयपी तुम्हाला १० ते १५ वर्षांकरिता मासिक तत्त्वावर नियमित कालावधीनंतर परतावा देऊ करतात (काही कंपन्या वार्षकि तत्त्वावरीलदेखील परतावा देतात). एमआयपीचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे प्रीमियम भरण्याच्या कालावधीतही तुम्हाला आयुर्वम्यिाची सुरक्षा मिळत राहते. काही प्लॅन्समध्ये तर नियमित उत्पन्न मिळण्याच्या कालावधीतही आयुर्वम्यिाची सुरक्षा कायम राहते. फक्त अर्थार्जन करणारी नियत किंवा आवर्ती ठेवींसारखी उत्पादने तुम्हाला एमआयपीप्रमाणे मृत्यूनंतर आयुर्वम्यिाची सुरक्षा देऊ करीत नाहीत, हा एमआयपीचा फायदा म्हणावा लागेल. अकाली मृत्यू झाल्यास एमआयपीमुळे आपल्या प्रियजनांच्या आíथक सुरक्षेची खबरदारी घेतली जाते. आयुर्वम्यिाची सुरक्षा योजनेबरहुकूम बदलत जाते, त्यामुळे योजनेतून मिळणारे संरक्षण तुमच्याकरिता पुरेसे आहे की नाही हे आधी तपासून घ्या. सुरक्षा तुमच्याकरिता अतिमहत्त्वाची असेल तर फक्त प्रीमियम भरण्याच्या कालावधीतच नव्हे तर उत्पन्न मिळण्याच्या कालावधीतही आयुर्वम्यिाची सुरक्षा कायम करणाऱ्या एमआयपीची निवड करा. तसेच तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभाच्या रकमेतून मासिक उत्पन्न वजा न करणाऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकता, जेणेकरून आयुर्वम्यिाच्या सुरक्षेअंतर्गत मिळणारी रक्कम कमी होणार नाही.
तुम्हाला करविषयक लाभ हवे असतील तर सद्य आयकर कायद्यांनुसार करविषयक लाभ मिळवण्याकरिता त्या योजनेत आयुर्वम्यिाची सुरक्षा पुरविली गेली आहे की नाही ते पाहा. याविषयी खात्री करून घेण्याकरिता तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करा.
विमा कंपनीकडून एमआयपीची खरेदी चालण्यासारखी आहे का?
सर्वप्रथम तुम्हाला या गुंतवणुकीतून कोणती आíथक उद्दिष्टे साध्य करायची आहेत ते ठरवा. तुम्हाला घर खरेदी करण्याकरिता किंवा मुलांच्या लग्नाकरिता मोठी रक्कम उभारायची आहे तर मोठा परतावा देणारा एन्डोमेंट प्लॅन तुमच्याकरिता सुयोग्य आहे. पण तुम्हाला तुमच्या राहणीमानाच्या किंवा इतर (वसतिगृहात राहणाऱ्या मुलाला आíथक साहाय्य किंवा पालकांना नियमित तत्त्वावर पसे पाठवणे) गरजा भागवण्याकरिता नियमित उत्पन्नाशिवाय अतिरिक्त उत्पन्न हवे आहे, तर एमआयपी हा पर्याय तुमच्याकरिता उत्तम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची आíथक उद्दिष्टे किती कालावधीत साध्य करायची आहेत ते पाहा. तुम्हाला आयुष्यभर काही प्रमाणात रक्कम मिळायला हवी आहे तर सतत उत्पन्न देत राहणारा अ‍ॅन्युइटी प्लॅन तुमच्याकरिता योग्य आहे. पण १०-१५ वष्रे तुम्हाला नियमित तत्त्वावर काही रक्कम मिळायला हवी आहे तर एमआयपी हा पर्याय निवडा.
एमआयपीमुळे कमी कालावधीत उत्पन्न मिळत असल्याने ते त्याच कालावधीत मिळणाऱ्या अ‍ॅन्युइटीपेक्षा नक्कीच जास्त असते. तसेच, अ‍ॅन्युइटीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो तर एमआयपीतून मिळणाऱ्या रकमेवर कर आकारला जात नाही.
कोणत्या प्रकारचा एमआयपी खरेदी करावा?
तुम्ही तुमचा पसा गुंतवताना किती जोखीम स्वीकारू शकता याबद्दल एकदा विचार करा. बाजाराशी संलग्न असलेले आणि नसलेले असे दोन्ही प्रकारचे एमआयपी उपलब्ध आहेत. संलग्न नसलेल्या प्लॅन्समध्ये तुम्हाला योजनेच्या अखेरीस खात्रीलायकरीत्या लाभ मिळतात पण, ते फार नसतात. त्याउलट बाजारसंलग्न प्लॅन्समध्ये लाभांची हमी दिली जात नाही पण बोनसची भर पडत राहिल्याने मिळणारे परतावे उच्च असतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर, एमआयपी हा तुमची आíथक उद्दिष्टे साध्य करण्याकरिता आयुर्वम्यिाचे संरक्षण अंतर्भूत असलेले कर-बचतीसह पूरक उत्पन्न मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. पण, त्या त्या योजनेतील काय द्यावे लागणार आहे आणि काय मिळणार आहे (‘गिव्ह अ‍ॅण्ड गेट’ रचनेची) याची खात्री करून घेणे केव्हाही हितकारक असेल.

(लेखक कॅनरा एचएसबीसी ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कं. लिमिटेडचे नियुक्त अ‍ॅक्च्युअरी आणि संचालक आहेत)

दक्षता
1 तुम्ही खरेदी केलेल्या योजनेच्या कामगिरीवर लक्ष ठेवा
2 ज्या उद्दिष्टाने ती योजना खरेदी केली आहे, त्या उद्दिष्टांची पूर्ती होत आहे की नाही याबद्दल कायम दक्ष राहा.
3 योजनेतून अधिकाधिक लाभाकरिता पॉलिसीचे प्रीमियम वेळच्या वेळी भरत राहा.
4 प्रीमियम्स भरणे-थांबवणे किंवा योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच योजनेतील गुंतवणूक काढून घेण्याने पॉलिसीतून मिळणाऱ्या लाभांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.