दादरच्या भवानी शंकर मार्गावर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५३ व्या शाखेचे उद्घाटन अलीकडेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, सिद्धार्थ कांबळे, एल. एच. गाजरे, संदीप घनदाट, अनिल गाजरे, पुरुषोत्तम दळवी, बँकेचे सरव्यवस्थापक नितीन बनकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
येत्या ३१ मार्चला बँकेचा अनुत्पादीत कर्जे-एनपीए ही शून्य टक्के होतील, तर नफा २५ कोटींवर जाईल, असे बँकेचे स्वच्छ प्रगती पुस्तक आहे, असे अध्यक्ष दरेकर यांनी याप्रसंगी बोलताना दावा केला.
स्वत:चा राखीव निधी व मालमत्ता ७०० कोटींपेक्षा जास्त असलेली ही देशातील सर्वात अग्रेसर जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याचेही त्यांनी सांगितले.