ऐतिहासिक उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारामुळे चालू वर्षांत म्युच्युअल फंड कंपन्यांमधील निधी प्रथमच ११ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचणार आहे.
२०१४ मध्ये फंड उद्योगावर भांडवली बाजार नियामकाचा नियम कठोरतेचा बडगा राहूनही झेपावणाऱ्या e05समभाग मूल्यांमुळे फंडांकडील गुंतवणूकदारांचा ओघ कायम राहिला आहे.
२०१४ मध्ये फंड घराण्याने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता. ऑक्टोबरमध्ये जवळपास १०.९६ लाख कोटी रुपये गुंतवणूक फंडांमध्ये नोंदली गेली होती.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच फंडांतील रक्कम ११ लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ती वार्षिक ३२ टक्क्यांनी उंचावत असल्याचे निरीक्षण फंड क्षेत्रातील कंपन्यांची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने नोंदविले आहे. म्युच्युअल फंड उद्योगासाठी नवे वर्षदेखील उत्साहवर्धक असेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष व रिलायन्स म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदीप सिक्का यांनी व्यक्त केले आहे.
देशभरात विविध ४५ फंड कंपन्या असून त्यांच्यामार्फत ४ हजारांहून अधिक योजनांचे निधी व्यवस्थापन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन लाख रुपयांनी फंड मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे.
डिसेंबरअखेरही फंडांतील वाढ कायम राहिल्यास सलग तिसऱ्या वर्षांतील फंड क्षेत्राची वृद्धी नोंदली जाणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही वर्षांत निधीतील ओघ आटला आहे.
२०१४ हे वर्ष भारतीय म्युच्युअल फंड उद्योगासाठी प्रतिनिधी शुल्क रचनेमुळे तसे अधिक गाजले. सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी विविध व्यासपीठांवरून म्युच्युअल फंड व्यवसायातील व्यवहारांवरून वेळोवेळी टीका केली होती.
या वर्षांत काही फंड घराणी तसेच योजनांच्या खरेदी-विक्री प्रक्रिया नोंदली गेली. यामध्ये दायवा, आयएनजी, मॉर्गन स्टॅनले, प्रॅमेरिका, फिडेलिटी (लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोकडे), पाइनब्रिज यांची नावे राहिली.
(पीटीआय : शिल्पी पांडे)