जेव्हा म्युच्युअल फंडांची निवड केली जाते तेव्हा ती एक विशिष्ट उद्देशांनी केलेली असते. काही कालावधी नंतर जेव्हा नवीन योजना गुंतवणुकीत समाविष्ट केली जाते तेव्हा पूर्वीच्या ठरविलेल्या वैविध्याला बाधा येते. जेव्हा नवीन योजनेचा समावेश गुंतवणुकीत होतो तेव्हा समभाग आणि रोखे गुंतवणुकीचे प्रमाण बदलले. नवीन गुंतवणुकीसाठी निवडलेली ही योजना बहुदा सर्वाधिक परतावा देणारी योजना असते. या योजनेच्या सामावेशामुळे मालमत्तेचे आणि समभाग गुंतवणुकीतील उप प्रकारचे प्रमाण बदलते.

शेअर बाजार निर्देशांक जसे नवनवीन शिखरांना स्पर्श करू लागले तसे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावासुद्धा वाढू लागला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी सजगता वाढल्याने म्युच्युअल फंडांकडे जागरुकता वाढू लागली. या जागरूकतेचा परिणाम बचतीचा मोठा हिस्सा – जो या आधी विमा किंवा बँकांच्या मुदत ठेवींसाठी राखून ठेवला जात होता तो हिस्सा आता म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा भाग होत असताना दिसत आहे. म्युच्युअल फंडात नवीन गुंतवणूक सुरू करताना नवीन गुंतवणूक आपल्या गुंतवणुकीत नसलेल्या फंडात हवी असे एक मिथक आहे.

अधिक फंड म्हणजे अधिक परतावा हे मिथक का आहे?

जेव्हा म्युच्युअल फंडांची निवड केली जाते तेव्हा ती एक विशिष्ट उद्देशांनी केलेली असते. काही कालावधी नंतर जेव्हा नवीन योजना गुंतवणुकीत समाविष्ट केली जाते तेव्हा पूर्वीच्या ठरविलेल्या वैविध्याला बाधा येते. जेव्हा नवीन योजनेचा समावेश गुंतवणुकीत होतो तेव्हा समभाग आणि रोखे गुंतवणुकीचे प्रमाण बदलते. नवीन गुंतवणुकीसाठी निवडलेली ही योजना बहुदा सर्वाधिक परतावा देणारी योजना असते.

या योजनेच्या सामावेशामुळे मालमत्तेचे आणि समभाग गुंतवणुकीतील उप प्रकारचे प्रमाण बदलते. समजा तुम्ही नव्याने एखाद्या मिड कॅप योजनेचा समावेश गुंतवणुकीत केलात तर मिड कॅप गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल.

तुमच्या जोखीम क्षमतेपेक्षा अधिक गुंतवणूक मिड कॅपमध्ये झाल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचा समतोल बिघडेल. इतकेच नव्हे तर तुमच्या गुंतवणुकीत आधीपासून असलेल्या फंडाच्या गुंतवणूक धोरणाची पुनरावृत्ती असणारा हा फंड असण्याची शक्यता असेल. बार्टन माल्केले लिखित ‘ए रॅन्डम वॉक डाऊन वॉल स्ट्रीट’ या पुस्तकात गुंतवणूकविषयक धोरणांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

लेखकाच्या मते, गुंतवणुकीत ठराविक वैविध्य साधल्यानंतर अतिरिक्त वैविध्य गुंतवणुकीतील जोखीम कमी न करता परतावाच कमी करते. विशेषत: एकाच प्रकारच्या अधिक फंडाचा गुंतवणुकीत समावेश होई.

नेमका केव्हा नवीन फंडांचा समावेश करावा?

१. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी नवीन आर्थिक ध्येयाची निर्मिती करण्याची गरज निर्माण होते. उदाहरणार्थ, कुटुंबात नवीन सदस्यांचे आगमन. नवीन बाळाच्या आगमनामुळे वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या कालावधीत या वित्तीय ध्येयाची पूर्तता करणे गरजेचे असते. या वित्तीय ध्येयासाठी नव्याने तरतूद करण्याची असल्याने सर्वार्थाने नवीन फंडांचा संच विचारात घेणे आवश्यक असते.

२. गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ झाल्यामुळे एखाद्या कुटुंबातील पती अथवा पीच्या उत्पन्नात वाढ होते. परदेशी नोकरी मिळाल्याने अथवा गृहकर्ज फिटल्याने दरमहा गुंतवणूक योग्य रक्कम हाताशी शिल्लक राहाते. कुटुंबाच्या गुंतवणूक योग्य रक्कमेत ५० टक्कय़ांहून अधिक कायम स्वरुपाची वाढ झाल्यामुळे नवीन फंडाचा समावेश करणे योग्य होईल.

या वाढीव गुंतवणूक योग्य रकमेमुळे जोखीम स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते किंवा वाढीव रकमेमुळे एखादे वित्तीय ध्येयाचा नव्याने समावेश झालेला असतो. मिड कॅप गुंतवणुकीत अधिक जोखीम असल्याने गुंतवणूक रक्कम कमी असल्यामुळे वित्तीय नियोजकाने मिड कॅप फंडांचा आधीच्या गुंतवणुकीत समावेश केला नसल्यास वाढीव गुंतवणूक योग्य रक्कमेमुळे नव्याने समावेश केला जाऊ  शकतो.

जेव्हा गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ होते तेव्हा काय करावे?

जेव्हा गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ होते आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सल्लागाराबरोबर चर्चा करता तेव्हा सल्लागार एखाद्या फंडाचा नव्याने समावेश करण्याऐवजी चांगली कामगिरी असलेल्या फंडात अधिक रक्कम गुंतवण्याचा सल्ला देईल. आढावा तेव्हा या गोष्टी ध्यानात घ्या –

१. नवीन गुंतवणुकीमुळे रोखे समभाग गुणोत्तराला बाधा येणार नाही.

२. नवीन फंडाचा समावेश करताना समान गुंतवणूक रणनीती असलेले फंड टाळावे. उदाहणार्थ, आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाईन इक्विटी फंड असेल तर फ्रॅकलीन इंडिया ब्लूचीप फंडाचा समावेश करणे योग्य होणार नाही. किंवा गुंतवणुकीत आधीपासून एखादा डायनॅमिक बॉंड फंड असेल तर दुसरा डायनॅमिक बॉंडाचा समावेश करण्यापेक्षा Rेडीट ऑपोच्र्युनिटी फंडाचा समावेश करणे योग्य धोरण आहे.

३. वाढत्या वयानुसार जोखीम स्वीकारण्याची क्षमता कमी होते. आधी रोखे व समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ५०:५० असेल तर आता ते ६०:४० करण्याची आवश्यकता आहे. अतिरिक्त उपलब्ध झालेली रक्कम समभाग गुंतवणुकीऐवजी रोखे गुंतवणुकीसाठी वापरणे योग्य ठरते. अथवा समजा समभाग गुंतवणुकीने चांगला परतावा दिल्याने हे गुणोत्तर पूर्वपदावर आणण्यासाठी नवीन गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

४. असा अनुभव आहे की, गुंतवणूकदारांना नेहमीच अव्वल परतावा देणाऱ्या फंडात नवीन रक्कम गुंतवावीशी वाटते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, आज क्रमवारीत पहिल्या पाचात असलेला फंड आणखी दोन वर्षांंनी Rमवारी राखेल असे नाही. म्हणून परताव्याचे सातत्य राखणाऱ्या  फंडाची निवड करणे अधिक योग्य होईल.

जेव्हा गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ होईल त्यावेळी नवीन फंडाचा समावेश करण्यापूर्वी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

(लेखिका फंड्सइंडिया डॉट कॉमच्या संशोधन प्रमुख आहेत.)