एकाचवेळी सहा योजना सादर
टाटा म्युच्युअल फंडाने अस्तित्वात असलेल्या एका व पाच नव्या योजनांचा गुच्छ गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणुकीसाठी ४ डिसेंबरपासून खुला होत आहे.
‘ऑन अ पीस ऑफ इंडिया’ या नाममुद्रेने या सहा योजनांचा संच असून अस्तित्वात असलेल्या टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेसोबत टाटा बँकिंग अ‍ॅन्ड फायन्शिअल सर्व्हिसेस फंड, टाटा डिजिटल इंडिया फंड टाटा इंडिया कन्झ्युमर फंड, टाटा इंडिया फार्मा व हेल्थ केअर फंड व टाटा रिसोर्स एनर्जी फंड अशा सहा फंडाचा या योजनेत समावेश आहे.
वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारे हे फंड असून या सहा योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्या इच्छेनुसार ठरविण्याचा पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सहा योजनांसाठी एकच धनादेश द्यायचा असून म्युच्युअल फंडाच्या अर्जात कुठल्या योजनेत किती पसे गुंतवायचे याचा तपशील द्यायचा आहे.
ही गुंतवणूक टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची युनिट्स गुंतवणुकीच्या दिवशीच्या नक्त मालमत्ता मुल्यास तर अन्य योजनांची युनिट १० रुपये दर्शनी मूल्यास खरेदी करता येऊ शकतील. पकी प्रत्येक योजनेस एक मुख्य निधी व्यवस्थापक व दोन सहा निधी व्यवस्थापक असतील. टाटा म्युच्युअल फंडाने अशा प्रकारचा भारतात प्रथमच असा प्रयोग केल्याचे टाटा म्युच्युअल फंडाचे मुंबई विभागीय विक्री प्रमुख दीपक मलिक यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
टाटा बँकिंग अ‍ॅन्ड फायनान्शिअल सíव्हसेस फंड हा प्रामुख्याने बँका पतमापन संस्था आíथक सेवा, गर बँकिंग वित्तीय कंपन्या यांच्या समभागात गुंतवणूक करेल. २०१९ मध्ये भारताचे सरासरी वय २९ असल्याने घर वाहन आदीच्या कर्जासाठी ही आदर्श बाजारपेठ समजली जाते. दीर्घकालीन विचार केल्यास बँकिंग क्षेत्राला उज्वल भवितव्य असल्याने या फंडातील गुंतवणूक ५ ते १० वष्रे मुदतीत अधिक परतावा देईल असा विश्वास फंड व्यवस्थापनाला आहे. टाटा इंडिया कन्झ्युमर फंड हा प्रामुख्याने जनसामान्यांच्या वापरातील वस्तू निर्माते व सेवा पुरवठादार यांच्याशी संबंधित कंपन्यातून गुंतवणूक करणारा फंड आहे. भारतातील तरुण लोकसंख्येमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची भारतातील बाजारपेठ २०१५ मध्ये जगातील पाचव्या क्रमांकांची बाजारपेठ असेल. ज्यात प्रामुख्याने वाढत्या नागरिकीकरणाचा फायदा होणाऱ्या ईकॉमर्स बाजारपेठेशी संबंधित कंपन्या, ज्यात प्रामुख्याने बदलत्या जीवन शैलीशी संबंधित कंपन्यांचा समावेश असेल. ‘सीएनएक्स कंझंप्शन इंडेक्स’ हा या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.
टाटा डिजिटल इंडिया फंड हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड असून हे क्षेत्र वार्षकि १२ ते १४ टक्के दराने वाढणारे क्षेत्र असल्याचा अंदाज माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची शिखर संस्था ‘नॅसकॉम’ने वर्तविला आहे. हा फंड प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, बीपीओ, केपीओ व्यवसायातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल.
एसएनपी बीएसई आयटी इंडेक्स हा या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे. या निर्देशांकाचा मागील दहा वर्षांत परताव्याचा दर १३.६ टक्के आहे. भारतातील कंपन्यांना इतर देशातील कंपन्यांकडून मोठी स्पर्धा असली तरीही आगामी ५ ते १० वर्षांत भारतीय कंपन्यांची नफा क्षमता मागील १० वर्षांच्या सरसरी नफाक्षमते इतपत असेल
टाटा इंडिया फार्मा व हेल्थकेअर फंड हा औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यातून गुंतवणूक करणारा फंड असून माहिती तंत्रज्ञानक्षेत्रा इतकेच औषध निर्मिती व आरोग्यनिगा क्षेत्र भारताच्या निर्यातीत महत्वाचे क्षेत्र आहे. अमेरिकेच्या निर्यातीत औषध निर्मिती व आरोग्यनिगा क्षेत्राचा वाट १२% आहे. या पकी भारतीय कंपन्या शरीरात टोचण्यासाठीची औषधे नेत्रनिगा व त्वचानिगा इत्यादी मर्यादित उत्पादन गटात सक्रीय आहेत. सीएनएक्स फार्मा इंडेक्स हा या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे. टाटा रिसोर्स एनर्जी फंड हा पाचवा नवीन फंड असून हा फंड प्रामुख्याने तेल व नसíगक वायू, सिमेंट व सिमेंट उत्पादने कागद निर्मिती, धातू रसायने किटकनाशके व रासायनिक खाते यांच्या कंपन्यातून गुंतवणूक करणारा फंड आहे.
‘तेल उत्खनन व तेल शुद्धीकरण वंगण उत्पादने यांच्या कंपन्याच्या आकर्षक मुल्यांकनामुळे गुंतवणूक करण्यास मोठा वाव असल्याचे दिसून येत आहे’, असे टाटा म्युच्युअल फंडाच्या टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचे निधी व्यवस्थापक रुपेश पटेल यांनी सांगितले.
सहावा फंड हा टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड असून ही या संचातील एकमेव अस्तित्वात असलेला फंड आहे.
‘गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन गुंतवणूकीतून संपत्तीची निर्मिती हा या यामागचा उद्देश आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या पसंतीनुसार उद्योग क्षेत्रे निवडण्याची संधी पहिल्यांदाच फंड घराण्याने भारतात गुंतवणूकदारांना दिली आहे’, असे रुपेश पटेल यांनी सांगितले. पाच फंडात मिळून ३०,००० रुपये ही सुरवातीची गुंतवणूक करावयाची असून नंतर सहा हजारांची एसआयपी या फंडात करता येऊ शकेल.
‘गुंतवणूकदारांना ५० टक्के रक्कम टाटा म्युच्युअल फंडाच्या नवीन फंड विक्रीत गुंतविण्याचा सल्ला दिला असून उर्वरित रक्कम लिक्विड फंडातून टप्प्या टप्प्याने एसडब्ल्यपी द्वारा गुंतविण्याचा सल्ला दिला आहे’, असे म्युच्युअल फंड विक्रेते रोमन सेठ म्हणाले.