डिझायनर फरशांच्या उत्पादनातील अग्रेसर एच अ‍ॅण्ड आर जॉन्सन (इंडिया)ने ‘होम लाइफस्टाइल’ या संकल्पनेला आपल्या उत्पादनश्रेणीत आणि प्रचार-प्रसारात महत्त्व देतानाच, कंपनीच्या ५५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका सेलिब्रिटीला ब्रॅण्डचा सदिच्छादूत म्हणून करारबद्धही केले आहे. जॉन्सनच्या टाइल्स, बाथरूम उत्पादने, इंजिनीअर्ड मार्बल्स, क्वार्ट्झ आणि कंपनीच्या मॉडय़ुलर किचन व्यवसायाचा प्रचार आता बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ करताना दिसेल, असे उभयतांमधील कराराप्रसंगी जॉन्सनचे मुख्य परिचालन अधिकारी सुशील माटे यांनी सांगितले. शिवाय ‘सोहो स्क्वेअर’ या व्यावसायिक संस्थेला जॉन्सन नाममुद्रेला कालसुसंगत ताजेपणा देणारे पुनर्आरेखन करण्यासाठीही कंपनीने करारबद्ध केले आहे.
‘लीव्हाइज’चा अर्धवार्षिक विक्री-उत्सव
आकर्षक सवलतीसह अधिकाधिक खरेदीवर अधिक लाभ देणारा सीझन समाप्तीचा अर्धवार्षिक विक्री-उत्सव ‘लीव्हाइज’ या फॅशन ब्रॅण्डने घोषित केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स, ट्राऊजर्स, लेगिंग्ज व अन्य बॉटमवेअरच्या खरेदीवर ४०%; दोन वा जास्त टीज्, शर्ट्स, स्टाइलिश ब्लाऊज व अन्य टॉपवेअरच्या खरेदीवर ३० टक्क्यांची सूट ग्राहकांना या निमित्ताने नजीकच्या लीव्हाइज स्टोअर्समध्ये मिळू शकेल.
यम्मीज चिकन पराठा
गोठवलेल्या खाद्यान्नाच्या (फ्रोजन फूड्स) श्रेणीत अनोखेपणासाठी ख्यातकीर्त बनलेल्या गोदरेज टायसनने आपल्या ‘रीअल गुड यम्मीज्’ या नाममुद्रेत नव्या उत्पादनाची भर घातली आहे. चिकन पराठा हा भारतात सादर झालेला पहिलाच खाद्यप्रकार आता या श्रेणीत उपलब्ध झाला आहे. शहरातील वेगवान व धकाधकीच्या जीवनात गृहिणींसाठी उपकारक ठरलेल्या या रेडी टू कूक खाद्यप्रकारातून चव आणि सोय या दोहोंची काळजी घेतली गेली आहे. ३२० गॅ्रमच्या या चिकन खिमा पराठा पॅकची रु. ९७ अशी विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे.
‘मान्सून मॅजिक’ अनुभूती
पावसाळ्यात गृहिणींवर पडणाऱ्या कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेऊन, त्यांना मदतकारक ठरतील अशी उत्पादने स्टार सीजे या आघाडीच्या होम शॉपिंग टीव्ही वाहिनीने सादर केली आहेत. पावसाळ्यात कपडे जलदगत्या वाळविणारे लाँड्री हँगर आणि वाकायचे कष्ट न घेता जमिनीच्या स्वच्छतेसाठी वापरता येणारे मॅजिक मॉप अशी उत्पादने स्टार सीजे मंचावर संपूर्ण पावसाळ्यात उपलब्ध असतील.
पुरुषांसाठी ‘शॉवर पॉवर’
पुरुषांसाठी सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ अधिकाधिक समृद्ध बनविणारी उत्पादने अर्थात स्त्रियांच्या त्वचेच्या तुलनेत पुरुषांच्या त्वचेचे वेगळेपण जोखून आयटीसी लिमिटेडची व्यक्तिगत निगा उत्पादनांची नाममुद्रा ‘फियामा डी विल्स’ने सादर केली आहेत. पुरुषांसाठी फेश वॉश, अ‍ॅक्वा पल्स डिओडरन्ट, शॉवर जेल, शॉवर बार अशा या उत्पादनांना पुरुष ग्राहकांचा प्रतिसाद जोखणारी वेबसाइट (www.fiamadiwillsmen.in/showerpower/) आणि ऑनलाइन स्पध्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. यातून पुरुष ग्राहकांच्या त्वचा निगेविषयक शिक्षण-प्रबोधनही करण्याचा कंपनीचा हेतू आहे.
लहानग्यांसाठी आभूषण-साज
आपल्या छोटय़ा प्रियजनांसाठी जरा हट के नजराणा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘एफएफएफ:)’ या नव्या बॅण्डने बहुविध पर्याय प्रस्तुत केले आहेत. या ब्रॅण्ड नवजात अर्भकापासून ते २० वर्षे वयाच्या कुमारांना शोभतील आणि भावतील अशा १८ कॅरेट सोन्यात घडलेल्या अंगठी, पेंडन्ट्स, ब्रेसलेट वगैरे आभूषणांची खास श्रेणी प्रस्तुत केली आहे. वैशिष्टय़पूर्ण कारागिरी आणि लक्षवेधी रंगांचा वापर केलेल्या आगळ्या डिझाइन्सचा वापर या आभूषणांसाठी केला गेला असून, ती किफायतीही असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. एफएफएफ:) आभूषणे सर्व आघाडीच्या रिटेलर्सकडे उपलब्ध आहेत.
‘बेन १०’ वाणिज्य उत्पादने
कार्टून नेटवर्क एंटरप्राइजने लहानग्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या बेन १०, रोल नं. २१, पॉवरपफ गर्ल्स या व्यक्तिरेखांच्या छबी असलेल्या विविध वाणिज्य उत्पादने प्रस्तुत केली आहेत. या ‘बॅक टू स्कूल’ उत्पादनांच्या श्रेणीत शाळेत जाऊ लागलेल्या बाळांसाठी सिपर- वॉटर बॉटल्स, लंच बॉक्सेस, पेन्सिल, पेन, पेन्सिल बॉक्सेस आदी रु. १० व त्यापेक्षा अधिक किंमतीच्या, तसेच रेनवेअर आणि पावसाळी परिधाने रु. २४० व त्यापेक्षा अधिक किमतीत, तसेच आकर्षक स्कूल बॅग्ज प्रस्तुत झाल्या आहेत. शिवाय घरातील लहानग्यांच्या साज-सामानात भर पडेल अशी दहा बेन-१० कलेक्टिबल्सही, तसेच टी-शर्ट्स व फूटवेअरही प्रस्तुत झाली आहेत.
‘नवनीत’कडून प्रगत इंग्रजी शब्दकोश
महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय मराठी-इंग्रजी शब्दकोशाची सुधारित व प्रगत अशी आवृत्ती नवनीत प्रकाशनाने प्रस्तुत केली आहे. भाषाप्रभू कै. प्रभुदेसाई यांच्याकडून संकलित मूळ १९९२-९३ (२० वर्षांपूर्वीच्या) ‘नवनीत अ‍ॅडव्हान्स्ड डिक्शनरी’च्या या अद्ययावत आवृत्तीत नवनवीन शब्दांची (तब्बल १० हजार) भर पडून पृष्ठसंख्या १४५६ वर गेली आहे. सहज वाचता येण्याजोगा मोठा टाइप, आंतरराष्ट्रीय दर्जाची सुबकता, मजबूत बाइंडिंग आणि उपयुक्त परिशिष्टे या वैशिष्टय़ांचीही यात नव्याने भर पडली आहे. सुधारित आवृत्तीच्या संकलनात प्रभुदेसाई यांच्या पश्चात दत्तात्रय केश दळवी यांनी गेली पाच वर्षे घेतलेली मेहनतीचीही जोड मिळाली आहे.
अभूतपूर्व फास्ट्रॅक ‘सेल’
घडय़ाळे, सनग्लासेस, बॅग्ज, बेल्ट्स आणि वॉलेट्स या उत्पादनांची दर्जेदार श्रेणी सादर करणाऱ्या फास्ट्रॅकने आजवरचा न भूतो अशा धाटणीचा सवलत विक्री-काळ घोषित केला आहे. येत्या २१ जुलै २०१३ पर्यंत या उत्पादनांवर ३० टक्क्यांपर्यंतची सवलत ग्राहकांना फास्ट्रॅक स्टोअर्स, शॉपर्स स्टॉप, सेंट्रल, लाइफस्टाइल, पँटालून्स, वेस्टसाइड अशा अग्रणी विक्री-दालनांमध्ये उपभोगता येईल.