सोने खरेदीसाठी खातेदारांना कर्ज देऊ नये, असे फर्मान भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य वाणिज्य बँकांना बजाविले आहे. धातू, दागिने, नाणी अथवा यूनिट (गोल्ड ईटीएफ) प्रकारातील सोने खरेदीसाठी ग्राहकांना वित्तीय पुरवठा करू न देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
सोन्यासाठी कर्ज घेणाऱ्या वित्तसंस्थांवर मर्यादा घातल्यानंतर मध्यवर्ती बँकेने आता थेट खरेदीदारांवर बडगा उगारला आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने सोने कर्ज घेणाऱ्या वित्तसंस्थांवरही बंधने घातली होती. वित्तसंस्थांनी खरेदी केलेल्या एकूण सोन्यापैकी केवळ ६५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज मिळण्याचा पर्याय दिला होता.
मौल्यवान सोने धातू खरेदीमुळे पिवळ्या धातूची आयातही वाढत असून त्याचा परिणाम देशाच्या चिंताजनक बनलेल्या वित्तीय तुटीवरही होत आहे. यासाठी सोने वापर कमी होण्याच्या दृष्टीने सरकारमार्फत वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचेच आगामी पाऊल म्हणून सोने खरेदी करण्यासाठी जर कुणी ग्राहक कर्ज घेत असेल तर त्याला ते देऊ नये, असेच रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य बँकांना सांगितले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयाचा सराफा व्यवसायावर फार काही विपरित परिणाम होणार नाही. सोन्यासाठी वित्तीय सहकार्य घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे एक टक्काच आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केली.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना