राष्ट्रीय शेअर बाजार- ‘एनएसई’वर व्यवहार करणाऱ्या सदस्यांना त्यांचे मोबाइल क्रमांक तसेच ई-मेल पत्ते अद्ययावत करण्यासाठी या बाजारमंचाने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
ग्राहकांपर्यंत भांडवली बाजाराबाबतची माहिती वेळोवेळी पोहोचविण्यासाठी येत्या १० ऑक्टोबपर्यंत या व्यासपीठावर व्यवहार करणाऱ्यांना संपर्क नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती अद्ययावतता करण्याची संधी यापूर्वी सप्टेंबर अखेपर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराने दिली होती. त्या आधी १९ ऑगस्ट या मूळ मुदतीत वाढ करण्यात आली होती.
 मोबाइल अथवा ई-मेल नसणाऱ्या सदस्यांना ऑनलाइन ‘युनिक क्लायंट कोड’ सादर करण्यात येणार असून, तसे त्यांनी आपल्या दलालांना (ब्रोकर) कळवावे आणि दलालांनी ते एनएसईला सूचित करणे बंधनकारक ठरणार आहे. या संबंधांने ‘सेबी’चे शेअर बाजारांना २०१२ सालात आदेश दिले होते.