अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला यामध्ये विविध विभागांसाठी नव्या घोषणा, सवलती तसेच विविध नव्या योजनांची घोषणा केली. परंतु, येत्या वर्षात सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहीलेले महत्वाचे केंद्रस्थान म्हणजे, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महागणार? त्यावर एक नजर..

स्वस्त होणाऱया वस्तू-
* संगणक, संगणाचे सुटे भाग आणि एलईडी-एलसीडी टेलिव्हिजन्स (१९ इंचाखालील)
* देशी बनावटीचे मोबाईल्स
* निर्देशीत अन्न पॅकेज उद्योगांच्या उत्पादन शुल्कात ६ टक्क्यांची घट
* हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या किंमतीत घट होणार
* ‘पॅकेज फुड’
* भारतीय बनावटीची सौरऊर्जा उपकरणे
* तेल, साबण
* प्रिंट मीडियामधील जाहीरातींवर कोणताही सेवा कर नाही
* खेळाचे साहित्य
* चपलांच्या किेमतीत घट

काय होणार महाग?-
* सिगारेटच्या दरात ११ ते ७२ टक्क्यांनी वाढ आणि पानमसाला, गुटखा, तंबाखू
* कोक, पेप्सी आणि सोडा असलेली शीतपेये
*  परदेशी बनावटीची स्टीलची भांडी
* सौंदर्यप्रसाधने
* बाटलीबंद ज्युस