नसíगक वायूचे वितरण करणाऱ्या आघाडीच्या महानगर गॅस लिमिटेडने पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांकरिता ‘एमजीएल कनेक्ट’ मोबाइल अ‍ॅप दाखल केले आहे. यामार्फत कंपनीच्या ग्राहकांना त्यांची सेवेची देयके भरता येणार आहे.
याबाबत महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव माथुर यांनी सांगितले की, पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांना अत्याधुनिक सेवा अनुभव देण्याच्या आणि वापरात सुलभता आणण्याच्या दृष्टीने एमजीएल कनेक्टचे डिझाईन करण्यात आले आहे.
एमजीएल कनेक्टमध्ये ग्राहकांना सहज वापरता येतील, अशा वैशिष्टय़ांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या अ‍ॅपमध्ये पीएनजी आणि सीएनजीकरिता दोन विभाग असून संभाव्य ग्राहकांकरिता एक वेगळा विभाग आहे.