देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी या बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. याबाबतच्या कृती आराखडय़ावर ते ३ जानेवारीला पुण्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा करणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीच्या पहिल्या दिवशी, २ जानेवारी रोजी बँकांच्या अर्थस्थितीवरही चर्चा होणार आहे. वाढत्या अनुत्पादित मालमत्ता अर्थात एनपीएची चिंता सध्या सार्वजनिक बँकांना भेडसावत आहे. या पाश्र्वभूमीवर सरकार तसेच बँकांना नेमके काय करता येईल, या दिशेने या बैठकीत विचारमंथन होणार आहे.
या चर्चेला अर्थमंत्री अरुण जेटली, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन तसेच केंद्रीय वित्त मंत्रालयातील वरिष्ठ सचिव, बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पीटीआय, नवी दिल्ली